Nashik Crime News : दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडलं, मात्र सेन्सर अलार्म वाजला अन्...
Nashik Crime News : नाशिकच्या येवला येथील एस. एस. मोबाईल या दुकानात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : एकीकडे दिवाळीची (Diwali 2024) धामधूम सुरु आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. नाशिकच्या (Nashik Crime News) येवला येथील एस.एस.मोबाईल या मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या येवला येथील एस. एस.मोबाईल या मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे व सेन्सर अलार्म वाजल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.
दीड लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांना चोरलेले मोबाईल तिथेच टाकून पळ काढावा लागला. मात्र दुकानातील रोख रक्कम व दोन मोबाईल असा दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मोबाईल दुकानातील चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास बेड्या
दरम्यान, बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईतास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शहरातील ठक्कर बस स्थानकात मुंबई-नंदुरबार बसमध्ये चढत असताना एका महिलेचे मंगळसूत्र चोरीस गेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई नाका, ठक्कर बाजार परिसरात वाढणारी गर्दी पाहता पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने माहिती संकलित केली असता सोनसाखळी चोरीमध्ये सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे आढळले. पोलिसांनी सापळा रचत साहिल पठाण (23, रा. श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीमुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील तीन आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या