एक्स्प्लोर

Nashik Crime: गुप्त दरवाजा उघडला अन् कार्यालयात सापडलं 'भुयार'; कब्जा केलेला 'तो' बंगलाही सील, लोंढे पिता-पुत्राचे कारनामे पाहून नाशिक पोलीसही चक्रावले!

Nashik Crime: आरपीआय जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या कार्यालयात गुप्त दरवाजाच्या मागे भुयार आढळल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

Nashik Crime: नाशिक शहरातून एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. सातपूर (Satpur) येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा मुख्य आरोपी आरपीआय जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या (Prakash Londhe) कार्यालयात गुप्त दरवाजा आणि त्यामागे भुयार सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. हे प्रकरण केवळ कार्यालयपुरतंच मर्यादित नसून, लोंढे पिता-पुत्राच्या टोळीने गँगस्टर स्टाइलमध्ये जबरदस्तीने बंगलाही बळकावल्याचं उघडकीस आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील आयटीआय पुलाजवळ प्रकाश लोंढे यांचे ‘धम्मतीर्थ’ नावाचे कार्यालय आहे. रविवारी सातपूर पोलिसांनी या कार्यालयावर धाड टाकली. प्रथमदर्शनी कार्यालय सामान्य वाटत होतं; आत फर्निचरच्या शोकेसेसची रचना होती. परंतु यातील एका शोकेसमागे गुप्त दरवाजा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

Nashik Crime: गुप्त दरवाजा उघडला अन् कार्यालयात सापडलं 'भुयार'

प्रकाश लोंढेला विचारणा केली असता त्याने दरवाज्याच्या अस्तित्वाचा इन्कार केला. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने अखेर एका शोकेसमधून गुप्त चावी काढली आणि दुसऱ्या शोकेसमध्ये ती लावून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच पोलिसांना एक गुप्त भुयार सापडले.

Nashik Crime: भुयारात काय सापडलं?

गुप्त भुयारात प्रवेश करताच पोलिसांनाही काही काळ विश्वास बसला नाही. चित्रपटातील दृश्यांप्रमाणे भुयारात दोन स्वतंत्र बेडरूम्स, हत्यारांचा साठा आणि महागड्या मद्याच्या बाटल्या सापडल्या. कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे, अशी हत्यारे, विदेशी ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या,  असा अंदाजे 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या भुयाराचा वापर गुन्हेगारी योजनांसाठी, गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा अवैध बैठका घेण्यासाठी केला जात होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Nashik Crime: पुष्कर बंगल्यावर जबरदस्तीने कब्जा 

याच टोळीने खुटवडनगरमधील ‘पुष्कर बंगला’ जबरदस्तीने बळकावल्याची तक्रार 8 ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिस तपासात उघड झालं की, लोंढे पिता-पुत्रांनी मूळ मालकाला धमकावून बंगला हडपला होता. बंगल्याच्या कर्जाची अडचण आणि आर्थिक निकष यांचा गैरफायदा घेत टोळीने मालकाला जाणीवपूर्वक त्रास दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अखेर पोलिसांनी हा बंगला सील केला आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime Ajay Bagul Arrested: भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget