Nashik Bus Accident : दरीत कोसळलेली अपघातग्रस्त बस काढण्यासाठी सप्तशृंगगड ते नांदुरी रस्ता आज बंद राहणार
Nashik News : सप्तशृंगगड ते नांदुरी आणि नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता आज (19 जुलै) बंद राहणार आहे. मागील आठवड्यात अपघात होऊन दरीत कोसळलेली बस काढण्यासाठी हा रस्ता बंद राहणार आहे.
Nashik Bus Accident : सप्तशृंगगड ते नांदुरी (Saptashrungi Gad To Nanduri) आणि नांदुरी ते सप्तशृंगगड (Nanduri To Saptashrungi Gad ) रस्ता आज (19 जुलै) बंद राहणार आहे. मागील आठवड्यात अपघात होऊन दरीत कोसळलेली बस (Bus Accident) काढण्यासाठी हा रस्ता बंद राहणार आहे. सकाळी दहा ते कार्यवाही पूर्ण होईपर्यंत रस्ता बंद असेल. अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. मागील आठवड्यात 12 जुलै रोजी सप्तशृंग गडावरील गणपती टप्प्याजवळ बस कोसळली होती. या अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चालक वाहक यांच्यासह 22 जण जखमी झाले होते.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाखाली कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी हे आदेश जारी केले आहेत. अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यासाठी राज्य परिवहन मंंडळाच्या कळवण आगार व्यवस्थापनाने परवानगी मागितली होती. राज्य परिवहन मंडळ ही बस दरीच्या बाहेर काढण्याची कार्यवाही करणार आहे. अपघातग्रस्त वाहन काढल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु होईल असं सांगण्यात आलं आहे.
सप्तशृंगी गड घाटात बस दरीत कोसळली
12 जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला. सप्तशृंगी गडावरुन बस साडेसहा वाजता निघाल्यानंतर पुढच्या दहा मिनिटात घाटातील गणपती पॉईंटजवळ बसला अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही बस सप्तशृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.
अपघातग्रस्त खामगाव आगाराची
अपघातग्रस्त बस बुलढाण्यातील खामगाव आगाराची असून 11 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर 12 जुलै रोजी पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरु झाला होता. परंतु वणीच्या सप्तशृंगी गडावरुन खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला तर इतर 22 जण जखमी झाले होते.
संबंधित बातमी