(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narhari Zirwal : गोकुळ झिरवाळ कुणाकडून आमदार होणार, शरद पवार की अजित पवारांची राष्ट्रवादी? नरहरी झिरवाळांनी दादांसमोरच सांगितलं!
Narhari Zirwal : संधी मिळाली तर वडिलांविरोधात निवडणूक लढणार, असे म्हणत नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे चर्चेत आले आहेत. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. तर माध्यमांशी संवाद साधताना माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असे वक्तव्य केले होते. संधी मिळाली तर वडिलांविरोधात निवडणूक लढणार, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आता नरहरी झिरवाळ यांनी गोकुळ झिरवाळ यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोरच स्पष्टीकरण दिले आहे.
आज अजित पवारांच्या उपस्थितीत आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Vidhan Sabha Constituency) 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ देखील उपस्थित होते.
...तर मी दादांना सांगेल त्याला आमदार करा : नरहरी झिरवाळ
नरहरी झिरवाळ म्हणाले की, दादा म्हणजे फणस आहे, वरून काटे आतमध्ये गरे आहेत, त्यात बिया सर्वांचा वापर होतो. कोणी काहीही बोलले तरी लक्ष देऊ नका. तुम्हाला काही कमी पडले तर सध्या मी लक्ष आहे. माझा मुलगा माझा आहे. त्याला आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेल त्याला आमदार करा. त्याच्याविषयी बातम्या सुरू आहे. पण तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटवर मुंबईमध्ये काम करतोय, असे स्पष्टीकरण नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.
1500 रुपये बहिणीला दिले पण आता तुम्ही दाजीला सांभाळा
नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले की, आम्हाला शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. या परिसरात धरण कधी होतील हे माहिती नाही, मात्र आम्हाला छोटे बंधारे तरी द्या. फॉरेस्ट प्लॉट देण्याची आमची मागणी आहे. मात्र वन पट्टे केवळ दोन गुंठे दिले आहे, असे त्यांनी म्हटले. 1500 रुपये बहिणीला दिले पण आता तुम्ही दाजीला सांभाळा. कुटुंबासाठी ते पैसे वापरा, शिक्षणासाठी त्या पैशांचा वापर करा.
अडचणींवर मात करण्याची धमक अजित पवार यांच्यात
सध्या कोण काय सांगतो हे आपण बघतो आहे. हा त्याचा दोष नाही, हा सिझन आहे, कोणीही येईल काहीही बोलेल, पण नंदी कधी येतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला विकास माहिती पाहिजे. आदिवासी विकासचे बजेट 54 वर्षात केले जाते. मात्र अजित दादांच्या काळात आपल्याला जास्त निधी उपलब्ध झाला आहे. गडचिरोली, पेठ, सुरगाणा सगळीकडे आदिवासींवर कर्ज आहे. अजित पवार यांच्या कामावर महायुतीत सर्व खुश असतात. अडचणीवर मात करण्याची धमक अजित पवार यांच्यात आहे, असे कौतुक त्यांनी यावेळी अजित पवार यांचे केले.
आणखी वाचा