MNS Vardhapan Din : 'आपल्याकडे हुकमी एक्का, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही' : बाळा नांदगावकर
आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर काहीही करून दाखवू शकतो. फक्त तुमची साथ हवी आहे. येण्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपण चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
MNS Vardhapan Din : मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा (MNS Vardhapan Din) कार्यक्रम नाशिकच्या दादासाहेब सभागृहात पार पडत आहे. या कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर काहीही करून दाखवू शकतो. फक्त तुमची साथ हवी आहे. येण्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपण चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, 18 वर्ष झाले, आपला प्रवास आनंदाने सुरू आहे. पुढील प्रवास असाच आनंदाने जल्लोषाने करायचा आहे. खाच खळग्याने भरलेला प्रवास आहे. नाशिकने भरभरून दिले आणि घेतले ही. चढ उतार यश अपयश बघितल्यानंतर ही आपली निष्ठा कायम आहे, तुमच्या निष्ठेला नमस्कार, असा बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
भोंगे आंदोलनं यशस्वी झाले
ते पुढे म्हणाले की, आपण खूप आंदोलनं केले, जेल भरो आंदोलन केले. पोलिसांचा मार खाल्ला तरीही आपण आहात. कोकणातील रस्त्यासाठी पदयात्रा काढली, आता रस्ता होतोय हे तुमचे यश आहे. पुण्यात अमित ठाकरेंच्या नेतृत्वात नुकताच मोर्चा काढला. एवढा मोठा मोर्चा कोणी काढला नव्हता. भोंगे आंदोलनं यशस्वी झाले. लोकांना त्रास होत होता, आपल्या भोंग्याचा आवाज उत्तर प्रदेश प्रयत्न पोहचला. पण इथल्या सरकारने प्रयत्न केले नाहीत.
आपल्याकडे हुकमी एक्का
आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर काहीही करून दाखवू शकतो. फक्त तुमची साथ हवी आहे. गेल्या 5 वर्षात राज्याचं राजकारण गढूळ झाले आहे. राज साहेब यांच्या शिवाय दुसरा माणूस नाही. दुष्काळामध्ये आपण अनेक ठिकाणी पाणी पोहचविण्याचे काम केले आहे. येण्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपण चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन, असा दावा वसंत मोरेंनी केला आहे. नाशिकमध्ये मनसेने सत्तेचं तोरण बांधलं होतं. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मेळाव्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहिल, असंही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा