मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
Mamad Union Bank FD Scam : मनमाडमधील युनियन बँक एफडी घोटाळ्याप्रकरणी आमदार सुहास कांदे यांनी स्वतः फिर्यादी होत वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नाशिक : मनमाडमधील (Manmad) युनियन बँक एफडी घोटाळ्याप्रकरणी (Union Bank FD Scam) आता नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी लक्ष घातले असून, घोटाळा करणाऱ्या संदीप देशमुख (Sandip Deshmukh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकणाऱ्या युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात स्वतः आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांसोबत फिर्यादी होवून पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
संशयित संदीप देशमुखसह सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी आमदार कांदे यांनी केली. फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आ.कांदे यांची भेट घेत अपहार प्रकरणात न्याय देण्याची साद घातली होती. त्यानुसार कांदे यांनी बँकेविरोधात तक्रार दाखल केली.
...तर आंदोलन छेडण्याचा इशारा
येत्या आठ दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पीडित ग्राहक व शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांसमवेत स्वतः युनियन बँकेच्या नाशिक येथील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लोकशाही मार्गाने आंदोलन (Agitation) छेडण्याचा इशाराही कांदे यांनी दिला. या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत ७० तक्रारदारांनी मनमाड पोलिसात (Manmad Police Station) तक्रारी दाखल केल्या आहेत.
फसवणुकीचा आकडा ५ कोटींच्या वर
युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केला. सुभाष देशमुख या विमा प्रतिनिधीने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले. त्यानंतर स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केला. सुरुवातीला 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपयांचा हा घोटाळा असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता फसवणुकीचा आकडा सुमारे 5 कोटींच्या वर गेला आहे.
नगरमध्येही पाच कोटींची फसवणूक
अहमदनगरमध्ये ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेने 14.40 टक्के व्याजदर देण्याचे बॅनर लावले तसा व्याजदरही ग्राहकांना दिला. नगर शहरातील सुजाता नेवसे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेली 3 लाख 75 एवढी रक्कम चांगलं व्याज मिळेल या उद्देशाने ध्येय मल्टीस्टेट निधी बँकेत ठेवली. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर बँकेतून पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना काहीच मिळालं नाही. नेवसे यांच्या प्रमाणेच जिल्ह्यातील 112 जणांना या बँकेने 5 कोटी 74 लाख रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये सात संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीची मुदत पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळाने पोबारा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या