एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये तस्कर आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट, हवेत गोळीबारही, तस्करीचा डाव उधळला! 

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करताना वनविभागाने (Nashik Forest) चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करताना वनविभागाने (Nashik Forest) चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बिबट्याच्या कातडीसह संशयितांना ताब्यात घेताच एकच खळबळ निर्माण झाली आहे. इगतपुरी वनविभागाने (Igatpuri Forest) ही कारवाई केली आहे. 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरातील जव्हार रोडवरील (Javhar Road) अंबोली फाट्यानजीक ही कारवाई करण्यात आली आहे. त्र्यंबकजवळील अंबोली जंगल परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती इगतपुरी प्रादेशिक वनविभागाला मिळाली. त्यावरुन इगतपुरी वनविभागाचं विशेष पथक अंबोलीकडे रवाना झाले.  

यावेळी इगतपुरी वनपथकाने बनावट ग्राहक बनून संशयितांना ताब्यात घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे बनावट ग्राहक बनून काही वन कर्मचारी संशयिताकडे गेले. तर काही कर्मचारी हे इशाऱ्याची वाट पाहत थांबले. ठरलेल्या ठिकाणी संबंधित संशयित इसम आल्यानंतर बनावट ग्राहक बनून गेलेल्या वन कर्मचारी सावध झाले. मात्र घटनास्थळी याउलट घडले. संशयितांना बनावट ग्राहकांचा संशय आल्याने वन कर्मचारी आणि संशयित यांच्यात झटापट झाली. 

दरम्यान झटापट एवढी वाढली की उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना हवेत गोळीबार करणे भाग पाडले. त्यानंतर संबंधित चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बिबट वाहनाची कातडी आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये प्रकाश लक्ष्मण राऊत, परशुराम महादू चौधरी, यशवंत हेमा मौळी, हेतू हेमा मौळी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान इगतपुरीच्या वनकर्मचाऱ्यांनी वेळीच सावध पवित्रा घेत मोहीम फत्ते केली. या कारवाईत पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन उमाकांत बिरारीस आणि टीम सहभागी होती.

अंबोली फाटा परिसर तस्करांचा अड्डा 
दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली फाटा परिसर तस्करांचा अड्डा बनत चालला आहे. अंबोली गावाच्या काही अंतरावर हा फाटा लागतो. येथून सरळ रस्ता जव्हार मार्गे गुजरातकडे तर दुसरा हरसूल मार्गे गुजरातकडे जाणारा  आहे. शिवाय या दोन्ही रस्त्यांना जंगलाला व्यापलेले आहे. तसेच अनेक पळवाटा असल्याने अनेकदा या मार्गाने वाहतूक होते. गेल्या काही वर्षांत या परिसरात अनेक अवैध मुद्देमाल हस्तगत केल्याच्या घटना आहेत. त्यातच आज बिबट कातडीच्या तस्करीचा डाव उधळण्यात आला. सध्या या बिबट्याची शिकार नेमकी कुणी व कुठे केली? यासह विविध प्रश्नांच्या उत्तरांचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
October Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Embed widget