Nashik News : आधी प्रेमविवाह नंतर अपहरण, नवऱ्यानेच केलं बायकोला किडनॅप, फिल्मी स्टाईल हाणामारी अन् जोरजबरस्ती CCTV मध्ये कैद!
ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. वेळप्रसंगी अनेक प्रेमी युगुल कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात.

नाशिक : ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. वेळप्रसंगी अनेक प्रेमी युगुल कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. काही प्रेमी युगुलांनी तर थेट पळून जाऊनही लग्न केल्याचे अनेक किस्से आहेत. पण सगळेच प्रेमविवाह हे शेवटपर्यंत टिकत नाहीत. कधीकधी सुरुवातीला एकमेकांवर जीवापाड प्रेम असणारे तरुण-तरुणी नवरा बायको झाल्यावर मात्र प्रेम विवाहानंतर सर्वच लग्न शेवटपर्यंत टिकत नाहीत. काही जोडप्यांत क्षुल्लक कारणामुळे भांडण होतात. असाच एक प्रकर सिन्नर तालुक्यात घडला आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच चक्क अपहरण केले आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिन्नर तालुक्यातील आहे. ज्या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता, त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर माहेरी निघून आल्यानंतर पतीने त्याच्या पत्नीचंच मित्रांच्या मदतीने अपहरण केलं आहे. ज्या महिलेचं अपहरण करण्यात आलं तिचं वय 19 वर्षे आहे. ही महिला आपल्या आईसोबत रस्त्याने जात होती. हीच योग्य संधी असल्याचे म्हणत पत्नीने त्याच्या पत्नीचं अपहरण केलं.
अपहरण नेमकं कसं केलं?
विवाहानंतर ही महिला रागाच्या भरात माहेरी निघून आली होती. ती आपल्या आईसोबत बाहेर आली होती. रस्त्याने चालत असताना एका कारमधून तिचा पती आला. त्याने तिला बळाचा वापर करून कारमध्ये बसवले. या अपहरणात आरोपी पतीच्या मित्रांनीही मदत केली. विशेष म्हणजे अपहरणाचा हा प्रकार घडत असताना विवाहित महिलेची आईदेखील सोबत होती. अपहरण होत असताना महिलेच्या आईने खूप विरोध केला. मात्र पतीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या आईलाही मारहाण केली. 19 मार्च रोजी दुपारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला.
या अपहराणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवली. त्यानंतर अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली. तसेच या महिलेच्या पतीला अटक केली. सध्या पतीवर सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र सध्या आरोपी पतीचे सर्व साथीदार फरार आहेत.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

