Nashik Satyajeet Tambe : विजयाचा आनंद साजरा करणार नाही, कारण... मतमोजणी दरम्यान सत्यजीत तांबे म्हणाले...
Nashik Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानस जाण्याचे दुःख आहे.
![Nashik Satyajeet Tambe : विजयाचा आनंद साजरा करणार नाही, कारण... मतमोजणी दरम्यान सत्यजीत तांबे म्हणाले... maharshtra news nashik news manas pagar not celebrate nashik graduate election win, said Satyajit Tambe Nashik Satyajeet Tambe : विजयाचा आनंद साजरा करणार नाही, कारण... मतमोजणी दरम्यान सत्यजीत तांबे म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/02/8f9ec2db9fb5e0b95013951bfb1123511675353044300441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Satyajeet Tambe : आज अत्यंत जवळच्या मित्राचे दुर्दैवाने निधन झालेले आहे. त्यामुळेच मानसच्या (Manas Pagar) परिवाराची भेट घ्यायला आलो होतो. या निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानस जाण्याचे दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साधारण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांनी सांगितले. याच माध्यमातून त्यांनी आपला विजय घोषित केल्याचेही दिसून आले.
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या असून सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. अशातच त्यांनी माध्यमांशी बोलताना आपला विजय देखील निश्चित असल्याचे सांगितले आहे, मात्र हा विजयाचा आनंद साजरा करणार नसल्याचे ते तांबे म्हणाले आहेत. आजच पहाटे नाशिक (Nashik) ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यभर गाजत असलेलय नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागत असताना सत्यजीत तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजीत तांबे म्हणाले, माझा मित्र मानसचे आज दुःखद निधन झाले. महाराष्ट्रामध्ये त्याचा अत्यंत चांगला मित्रपरिवार होता. विचारांशी अतिशय निष्ठावान असलेला कार्यकर्ता होता. मागील दहा-पंधरा दिवसांच्या राजकारणामध्ये देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. फेसबुकवर जाऊन बघितले तर खंबीरपणे माझी बाजू तो मांडत होता आणि दुर्दैवाने त्याचं निधन झालेले आहे. त्यामुळेच खर तर मानसच्या परिवाराची भेट घ्यायला आलो होतो. त्यामुळे या निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी माणसं जाण्याचे दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साधारण करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तो आमचा अत्यंत जवळचा सहकारी होता. असे त्याचे जाण्याच्या काळामध्ये विजयोत्सव साजरा करणे योग्य राहणार नाही. त्यामुळे साधारण विजयोत्सव करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे तांबे म्हणाले.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शनचा विषयावर ते म्हणाले कि, विजयानंतर काय भूमिका असणार ते लवकर सांगेल. त्याचबरोबर या निवडणुकीत मतदान अतिशय कमी झाले. यावर ते म्हणाले, निवडणूक मतदानाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेक मतदार हे कामावर होते. त्याचप्रमाणे मतदार यादीत अनेक नावांचा घोळ होता. या बुथचे त्या बुथवर नावे गेल्यानेही अनेक मतदारांनी जाण्याचे टाळले. शिवाय कोणत्याही निवडणुकीत बाद मते होतात. पाच फेऱ्या आहेत, निकाल येईलच थोड्या वेळात, असा विश्वास देखील सत्यजीत तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)