(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : 'मी अजूनही नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री, नाशिकबद्दल प्रेम', भुजबळांकडून गोदावरीची पूरपाहणी
Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) जिल्ह्याचा पालकमंत्री, नाशिक बद्दल असलेले प्रेम या हेतूने गोदावरीची (Godavari Flood) पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) जिल्ह्याचा पालकमंत्री, नाशिक बद्दल असलेले प्रेम आणि नवीन पालकमंत्री येईपर्यंत आपणच कारभार पाहावा या हेतूने गोदावरीची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे वक्तव्य माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरीला पूर (Godavari Flood) परिस्थिती कायम आहे. या पुराची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ यांनी गंगेवर भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक शहरसह जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. मुसळधार पावसामुळे पूर अद्यापही कायम आहे. त्यामुळे नदी काठाच्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. गोदाकाठी असलेल्या अनेक इमारती आणि वाड्यांचे तळमजले हे गेल्या दोन-तीन दिवसापासून पाण्यातच आहेत. याबाबतची पाहणी करण्यासाठी आज माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशकात आले होते.
यावेळी ते म्हणाले की नाशिक शहरातील गावठाण भागात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ज्यादा एफएसआय देऊन इमारती पाडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परंतु महापालिकेकडून त्याचा योग्य तो पाठपुरावा होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक मनपाचे आयुक्त दोघेही नवीन असल्याने त्यांचा हा पहिलाच पूर आहे. तसेच त्यांना नाशिकच्या पुराबाबतची कल्पना नसल्याने एकमेकांच्या संपर्कात राहून पुराचा आढावा घ्यावा, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या असल्याचे भुजबळांनी सांगितले.
तसेच नाशिक पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने पाणी कपातीचे संकट टळले आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणात पाण्याचा साठा होत असताना टप्प्याटप्प्याने तो विसर्जन करण्यात यावा एकदम विसर्ग केल्यास मागील काही वर्षांपूर्वी प्रमाणेच परिस्थिती उद्भवू शकते. नागरिकांसह व्यापाऱ्यांचे नुकसान दरवर्षी होते. ते टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम करावे. तसेच काझीगढीच्या प्रश्न बाबतही येत्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असल्याने अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशिवाय अन्य मंत्र्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि या जिल्ह्याबद्दल असल्या प्रेम त्यामुळे नवीन पालकमंत्री पर्यंत आपणच कारभार पहावा या हेतूनही पाहणी केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर शहरात असलेले सत्ताधारी पक्षाच्या तीन आमदारांपैकी एकाही आमदाराने पाहणी केली नसल्याबाबत विचारले असता ते पण लवकरच पूर पाहण्यासाठी येथील अशा भुजबळ पद्धतीने त्यांनी टोला लगावला.