(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinayak Raut : 'सावंतवाडीमध्ये उभे रहाच, डिपॉझिट जप्त करू', विनायक राऊत यांचं केसरकरांना खुलं आव्हान
Vinayak Raut : केवळ मंत्रीपदाच्या लालसेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बेईमानी केली, असं विनायक राऊत म्हणाले.
Vinayak Raut : 'दीपक केसरकर (Deepak Kesarkar) बोलता पोपट असून अशा बेताल वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. केवळ मंत्रीपदाच्या लालसेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बेईमानी करणे आणि ज्याच्यासोबत लाचारी केली, आता त्याचे गुणगान गायचे हा त्यांचा धंदा आहे. उपकारकर्त्याचे उपकार अपकाराने कसे फेडावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपक केसरकर असल्याची टीका करत सावंतवाडीमध्ये उभे रहाच, डिपॉझिट जप्त करू, असे खुलं आव्हान उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केसरकरांना दिले आहे.
आज नाशिकमध्ये (Nashik) अनेक नेते मंत्री दाखल होते. त्यापैकी एक म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत (Vinayak Raut) हे देखील नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तत्पूर्वी विनायक राऊत यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, संभाजी भिडे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्ये केली, त्याचा निषेध आहे. कोणत्याही थोर नेत्याचा अवमान होणे योग्य नाही. भिडे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असं प्रामाणिकपणे मी सांगेल. तसेच भिडे गुरुजी ज्या पद्धतीने मोदी यांचे समर्थन करत आहे, त्यामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी सावंत यांनी केला.
तर मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही राऊत यांनी आसूड ओढला. ते म्हणाले की, दीपक केसरकर बोलता पोपट असून अशा बेताल वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. केवळ मंत्रीपदाच्या लालसेसाठी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यासोबत बेईमानी करणे आणि ज्याच्यासोबत लाचारी केली, त्याचे गुणगान गायचे हा त्यांचा धंदा आहे. उपकारकर्त्याचे उपकार अपकाराने कसे फेडावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपक केसरकर असून सावंतवाडीमध्ये उभे रहाच, डिपॉझिट जप्त करू, असे खुले आव्हान विनायक राऊत यांनी केसरकरांना दिले आहे. तसेच दीपक केसरकर आज म्हणाले की, मी शिर्डीत असल्याने पाणी पातळी वाढली नाही. यावर राऊत म्हणाले, केसरकरांनी मणिपूरबाबत पण प्रार्थना करावी, केसरकरांनी त्यांच्या मतदारसंघातील गावे बुडू नये, म्हणून पण प्रार्थना करावी. माझ्या प्रार्थनेमुळे कोल्हापूरला पूर आला नाही, असं सांगण्याचा मूर्खपणा केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो, इतर कोणी नाही, असा घणाघात राऊत यांनी केला.
पंतप्रधानांना बोलतं करण्याचं काम करणार
लोकसभेचे अधिवेशन सुरु असताना विरोधकांनी मणिपूरच्या घटनेसंदर्भात पंतप्रधानांवर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, देशाचे गृहमंत्री चार दिवस तिथे राहिले, पण काहीही करू शकले नाही. त्यावर चर्चा व्हावी आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र लोकसभेच्या आतमध्ये न येणे हा पंतप्रधानांचा कोणता दुराहट्ट आहे, मी समजू शकत नाही. म्हणून विरोधी पक्षांनी अविश्वास सारखा आपला आयुध उभारला. मात्र पंतप्रधान बोलले नाहीत, मात्र पंतप्रधानांना बोलत करण्याचं काम विरोधी पक्ष करणार असल्याचे राऊत म्हणाले. तर संजय शिरसाठ यांच्यावर टीका करताना दे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने गद्दार गटातून काही जणांना भुंकण्यासाठी ठेवले आहे. त्यातले हे संभाजीनगरचे आणि कणकवलीचे दुसरे एक मंत्री मंडळाची वाट आपली सुकर करायची का, असा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले.