Nashik News : लोणावळा बालक मृत्यू प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल, स्विमिंग टँकमध्ये बुडाल्याची घटना
Nashik News : लोणावळा (Lonawala) परिसरात बंगल्यातील जलतरण तलावात (Swimming Pool) बुडून बालकाचा मृत्यू (Child Death) प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Nashik News : लोणावळा (Lonawala) परिसरात बंगल्यातील जलतरण तलावात (Swimming Pool) बुडून दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू (Child Death) झाल्याप्रकरणी पोलिसांनी बंगला मालकासह सहा जणांविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) येथून लोणावळा येथे वाढदिवसाच्या (Birthday Celebration) सेलिब्रेशनसाठी गेलेल्या एका कुटुंबातील दोन वर्षे मुलाचा स्विमिंग टॅंकमध्ये बुडून मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणी पुष्पमिला बंगल्याचे मालक डॉ. प्रमोद काशिनाथ बहाळकर बंगल्याची व्यवस्था सांभाळणारे नरेश कुमार मुरलीधर भोजवानी, राजेश निंबाळे लोणावळा नगरपरिषदेतील अधिकारी तसेच अन्य तीन जणांविरोधात दुर्घटनेत जबाबदार असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉलमध्ये हजर असलेले इतर तीन व्यक्तींनी लोणावळा नगरपरिषद यांच्या करतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अखिल कुमार नारायणराव पवार यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अखिल कुमार पवार यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाशिकहून लोणावळ्यातील पुष्पव्हीला बंगल्यात कुटुंबासह आले होते. जलतरण तलावाच्या परिसरात खेळणी ठेवली होती. त्यावेळी अखिल कुमार यांचा दोन वर्षाचा मुलगा शिवबा खेळण्याकडे आकर्षित झाला आणि तो रांगत जलतरण तलावाजवळ गेला. यावेळी तो तलावात पडल्याने तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला होता.
अशी घडली घटना
नाशिकला राहणारे पवार कुटुंबीय हे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्यातील एका व्हिलामध्ये वाढदिवस करण्याचा बेत पवार कुटुंबीयांनी आखला होता. त्यानुसार ते लोणावळ्याला पोहचले. यावेळी वडील चेक इनच्या फॉर्मलिटीज पूर्ण करत असताना मुलगा स्विमिंग टँकच्या दिशेने गेला आणि खेळण्याकडे आकर्षित होवून पाण्यात पडला. यात शिवबा अखिल पवार या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शिवाय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाला होता. या घटनेने लोणावळासह पवार कुटुंबीय राहणाऱ्या परिसरात खळबळ उडाली होती.
जलतरण तलावांचे पेव
दरम्यान लोणावळा, खंडाळा परिसरात अनेक बंगले पाहायला मिळतात. हे बंगले फिरायला आलेल्या पर्यटकांना बंगले भाड्याने दिले जातात. बंगल्यातील सुरक्षा विषयक उपाययोजनांची जबाबदारी बंगला मालक व संबंधितांनी करणे गरजेचे आहे. लोणावळा परिसरात अनेक बंगल्यात जलतरण तलाव असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. तर जलतरण तलाव बांधण्यास नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेकांनी बेकायदा जलतरण तलाव बांधल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसापूर्वी लोणावळ्यातील एका बंगल्यात जलतरण तलाव परिसरात विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.