Nashik News : नाशिक रेल्वेस्थानकात सुरू होतंय पॉड हॉटेल, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग, लॉकर्ससह बरंच काही!
Nashik News : नाशिकरोड रेल्वे स्थानकात (Nashik Road Railway Station) बारा पॉड हॉटेल (Pod Hotel) सुरू करण्याचा निर्णय भुसावळ (Bhusawal Railway Junction) विभागाने घेतला आहे.
Nashik News : नाशिकला (Nashik) अल्पकाळासाठी किंवा नेहमी येणारे पर्यटक (Tourist) प्रवासी व्यापारी यांच्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात (Nashik Road Railway Station) बारा पॉड हॉटेल (Pod Hotel) सुरू करण्याचा निर्णय भुसावळ (Bhusawal Railway Junction) विभागाने घेतला आहे. दिल्ली विमानतळ, मुंबई (Mumbai) रेल्वे स्थानक आदी ठिकाणी अशी छोटी पॉड हॉटेल सुरू झाली असून सुरक्षित निवासासाठी त्यांचा चांगला उपयोग होत आहे.
नाशिकरोड हे महत्वाचे रेल्वेस्थानक समजले जाते. या ठिकाणी देशातल्या महत्वाच्या रेल्वे थांबा घेतात. त्यामुळे देशभरातून पर्यटक नाशिकला भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर हि छोटी छोटी पॉड हॉटेल्स उभारण्यात येणार आहे. याबाबत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मालपुर म्हणाले कि, नाशिकरोड रेल्वे स्थानकातील मुख्य इमारतींमध्ये १२ पॉड हॉटेल सुरू केली जातील. दरम्यान यातील काही हॉटेल्स हि फॅमिलीसाठी तर काही वैयक्तीक वापरासाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान नाशिक हे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. धार्मिक दृष्ट्या नाशिकला अनन्यसाधारण महत्व असल्याने लाखो भाविकाला नाशिकला अभेत देत असतात. अशावेळी अनेकांना रेल्वेस्थानकावर राहण्याची व्यवस्था असायला पाहिजे, याबाबत प्रवासी आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. पॉड हॉटेलच्या रूपाने सुरक्षित आणि आरामदायी छोटेघरच उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यटकांचा लॉज, इतर मोठ्या हॉटेलचा होणार खर्च टळणार आहे.
सध्या तरी नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकावरील मुख्य इमारतीमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्यात येतील. त्यानंतर जागेची उपलब्धता पाहून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातील पहिल्या मजल्यावर पादचारी पुलाशेजारी वातानुकूलित लावून रेल्वे प्रशासनाने तयार केले आहे. तेथे पोड हॉटेल सुरू केले जाईल. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील लिफ्ट खाली देखील पॉड हॉटेल सुरू केले जाईल. तेथे प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने सुरक्षा रक्षक नियुक्त केले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
नेमकं कसे असणार पॉड हॉटेल
दरम्यान पॉड हॉटेल हि संकल्पना जपानमध्ये सुरु झाली आहे. यामध्ये 3000 चौरस फूट जागेत रूम सारखे छोटे कॅप्सूल असतात. त्यामध्ये टीव्ही, आरसा, एसी, इंटिरियर लाईट, मोबाईल चार्जिंग, लॉकर्स, डीलक्स टॉयलेट, बाथरूम, शॉवर, कॉमन वॉशरूम, मोफत वायफाय आधी सुविधा असतात. भारतीय रेल्वेने अर्बन पॉड हॉटेलला नववर्षांसाठी देशात अशी हॉटेल्स उभारण्याचे कंत्राट दिले आहे. शिवाय पॉड हॉटेलमधूनच मिळणाऱ्या महसुलाचे काही भाग रेल्वेला द्यावे लागणार आहेत. नाशिक हे महत्त्वाचे धार्मिक औद्योगिक आणि पर्यटन शहर असल्यामुळे रेल्वेने येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या तिन्ही कारणांसाठी येणाऱ्यांची सोय करणे आणि महसूल वाढवणे हा पौड हॉटेल सुरू करण्यामागील उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.