Nashik News : नाशिकच्या पोलीस नाईक अश्विनी देवरे पोलीस दलातील पहिल्या 'आर्यनमॅन', कझाकीस्तानमध्ये फडकवला तिरंगा!
Nashik News : नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड (Nashikroad Police Station) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अश्विनी देवरे (Ashwini Deore) यांनी कझाकीस्तानमध्ये तिरंगा फडकवला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड (Nashikroad Police Station) पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक अश्विनी देवरे (Ashwini Deore) यांनी कझाकीस्तानमध्ये तिरंगा फडकवला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन (Ironman) वूमन होण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे.
देशभरात स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या (Independance Day) कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम सुरू असताना महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस नाईक अश्विनी गोकुळ देवरे यांनी कजाकिस्तान मध्ये तिरंगा फडकवला आहे. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वुमन होण्याचा रेकॉर्ड केला आहे.
कदाकिस्तानमध्ये आर्यनमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धकांबरोबर देवरे देखील सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 40 ते 44 वयोगटात महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेतील पोलीस नाईक अश्विन देवरे सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धेतील 3.8 किलोमीटर स्विमिंग, सायकलिंग 180 किलोमीटर व 42.2 किलोमीटर धावणे अशी स्पर्धा असून एकूण 17 तासांमध्ये पूर्ण करावे लागते. मात्र हे तीन टप्पे अश्विनी देवरे यांनी 14 तास 24 मिनिटे 46 सेकंदात पूर्ण केले. यात दोन तास एक मिनिट 42 सेकंदात स्विमिंग, सात तास नऊ मिनिटे 30 सेकंदात सायकलिंग व चार तास 53 मिनिटे 32 सेकंदात रनिंग पूर्ण करत आयर्नमॅन होण्याचा मन मिळवला.
देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस दलातील पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी पोलीस दलासह नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर अश्विनी देवरे याना विशेष मेडलने गौरविण्यात आले. देवरे या पोलीस दलात 2019 भरती झाल्या असून सध्या जिल्हा बदली झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस खात्यातील कर्तव्य आणि संसारांचा गाडा उत्तमरीत्या हाकत त्यांनी अनेक स्पर्धा काबीज केल्या आहेत. श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 40 सुवर्ण 21 रोग 28 पदके पटकावले आहे आता आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी बाजी मारून महाराष्ट्र पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.
दरम्यान या यशानंतर अश्विनी देवरे म्हणाल्या कि, नोकरी करण्याच्या आधीपासून खेळाची विशेषत: धावण्याची विशेष आवड असल्याने हि स्पर्धा यशस्वीरीत्या जिंकली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर पॉवर लिफ्टिंग व वेट लिफ्टिंगमध्ये करिअरला सुरुवात केली. यश तर मिळाले, पण मणक्याचा त्रास सुरू झाला. यामुळे हे खेळ इथेच थांबले. शिवाय या काळात लग्नही होऊन नाशिकमध्ये बदलीही झाली. दोन मुलांना घेऊन आपला संसाराचा गाडा हाकताना पोलिस कर्तव्य आणि खेळास अंतर दिले नाही. आजही परिस्थिती काहीही असो, माझा सराव बंद पडत नाही. रोज सकाळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर माझा सराव सुरू असतो.