एक्स्प्लोर

Akole Nilwande Dam : आज आनंदाचा दिवस, तब्बल 53 वर्षांनी दुष्काळी भागाच भाग्य बदललं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले.... 

Akole Nilwande Dam : आज निळवंडे धरणातून (Nilwande Dam) कालव्यांद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले.

Akole Nilwande Dam : 'माझ्या जन्मापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला आणि आज आम्ही 5700 कोटींची सुप्रीमा काढल्यामुळे पाणी सोडता आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. तर 6 कोटींचा प्रकल्प 5 हजार कोटींवर पोहचल्यावर तब्बल 52 वर्षांनी दुष्काळी भागाच भाग्य बदललं असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. 

आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील निळवंडे धरणातून (Nilwande Dam) कालव्यांद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले. यावेळी बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर वाहणारे खळखळणारे पाणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 1970 साली 6 कोटी खर्च असलेल्या निळवंडे धरण बांधण्याचा निर्णय  झाला आणि जागा सुद्धा ठरविण्यात आली. मात्र 1970 पासून 1993 पर्यंत अनेक गावात विरोध झाल्यामुळे 1993 ला निळवंडे गावात धरण बांधण्याचा निर्णय झाला. आधी पुर्नवसन नंतर धरण हा प्रयोग राज्यात प्रथमच राबवत या कामाला सुरुवात झाली आणि 2011 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झालं. मात्र ज्या दुष्काळी भागासाठी धरण बांधण्यात आले ते कालव्यांची काम रखडल्याने मोठी नाराजी निमार्ण झाली. पाटपाण्यासाठी शेतकऱ्यानी समिती स्थापन करत लढा दिला. त्यानंतर 85 किमी लांबीच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या भाषणातून म्हणाले आज आनंदाचा दिवस असून पाणी सोडल्यावर प्रचंड गतीने पाणी आल्याने आनंद झाला. हा प्रकल्प माझ्या जन्माआधीचा असून 6 कोटींचा प्रकल्प 5 हजार कोटींवर गेला. प्रकल्पाच्या सुरवातीला विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना सुरवातीच्या 25 किलोमीटरच्या कामात अडचणी होत्या. त्यानंतर मधुकर पिचड यांना विश्वासात घेतले तर यात मार्ग निघेल अशी सूचना विखेनी केली. खासदार लोखंडे यांनी सुद्धा परिश्रम घेतले. मागच्या अडीच वर्षात आम्ही मंजूर केलेले 450 कोटी मिळाले. आता नवीन सरकार आल्यावर 5177 कोटींची नवीन सुप्रमा आणून मान्यता दिली. तसेच यावर्षीच्या बजेट मध्ये सगळ्यात जास्त पैसे निळवंडे प्रकल्पाला दिले...

मी देखील गावी जातो, तेव्हा शेतीत रमतो..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सगळ्यांच्या आयुष्यातील आजचा आनंदाचा दिवस असून पहिल्या कॅबिनेटपासून अनेक निर्णय घेतले. आपलं सरकार स्थापन होण्या आधी काम झालं नाही. मात्र आपण सत्तेवर आल्यावर अनेक सिंचन प्रकल्पाना सुधारित मान्यता दिली आहे. हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सरकार असून माती आणि आपलं नात महत्वाचं असून मी शेतकऱ्याच्या घरातीलच असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच शेतकरी हा आपला अन्नदाता असून अडचण आल्यावर त्याच्यामागे उभी राहण्याची आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केलं. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवातीलाच मधुकर पिचड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचे चिरंजीव यांचे कौतुक करताना म्हणाले कि, वैभव पिचड जोरात काम करतात पाणी सुद्धा जोरात सुटलं आज, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

आज पाणी शुद्ध आल, तुमचं मन, सुद्धा शुद्ध ठेवा

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, आज भावना दाटून येत असून प्रदीर्घ काळाचा लढा आज संपला आहे. धरण बांधण्यासाठी जागा दिलेल्या सर्व शेतकऱ्यांच नमन करून आभार मानतो. आधी पुनर्वसन मग धरण, या भूमिकेतून आजचा दिवस पाहायला मिळतो. अनेक राजकीय पक्षांनी योगदान या कामासाठी दिले. फडणवीस मुख्यमंत्री असताना रखडलेले काम पुढे गेले. शिर्डीच्या सहवासात आहात, तुम्ही चिंता करू नका, असा सल्ला यावेळी खासदार लोखंडे यांना विखे पाटील यांनी दिला. आज जनतेच सरकार सत्तेवर असून पूढील काळात सुद्धा अजून काम आपण करणार आहोत. अनेकांना उत्सुकता होती, काय बोलतील, मात्र आज सगळे वाद पाण्यात गेले. आज पाणी शुद्ध आल, तुमचं मन सुद्धा शुद्ध ठेवा. 

श्रेयवादाची लढाई सुरूच... 

दरम्यान 53 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज डाव्या कालव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 111 आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांना पाणी मिळणार असून तब्बल 45 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाटपाण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना आज आनंद झाला असून अनेक आंदोलन केली, गुन्हे दाखल झाले. मात्र आज आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे धरण निर्मिती पासून ते कालवे निर्मिती पर्यंत अनेक सरकार आली आणि गेली. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी योगदान दिले असताना आज शिवसेना व भाजप व्यतिरिक्त एकाही अन्य पक्षाच्या नेत्याना निमंत्रण नव्हते, हे विशेष. त्यामुळे आगामी काळात सुद्धा श्रेयवादाची लढाई अशीच सुरू राहिली तर नवल वाटायला नको. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget