(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Amruta Pawar : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अमृता पवार आज फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार
Nashik Amruta Pawar : माजी खासदार वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar) या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Nashik Amruta Pawar : नाशिकच्या (Nashik) राजकारणातील महत्वाची बातमी समोर येत असून आज माजी खासदार वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar) या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत (Nashik Loksabha) चुरशीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह (Mahavikas Aaghadi) इतर घटक पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. मालेगाव (Malegaon) येथील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून नाशिकला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचे दिसून येत आहे.
दरम्यन अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीने केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत गोडसे निवडून आले आहेत. मात्र आता सत्ताबदल झाला असल्याने शिंदे गट आणि भाजप एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र आहे. सोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र आहे.
अनंतराव देशमुख कोण आहेत?
अनंतराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री तथा वाशिम अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनंतराव देशमुख कॉंग्रेसमध्ये सक्रिय नाहीत. पण ते इतर कुठल्याच पक्षात गेले नाहीत. त्यांचे अनेक कार्यकर्ते मात्र कॉंग्रेसमध्ये पदाधिकारी आहेत. अनंतरावांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अमित झनक यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. तसे त्यांनी 2009 मध्ये अमित यांचे वडील सुभाष झनक यांच्याविरोधातही दंड थोपटले होते. पण थोडक्यात यश हुकले. पण, लोकसभा निवडणुकीत मात्र अकोला मतदारसंघात अनंतराव कायम कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत आले. आता ते भाजपमध्ये जात आहेत.
कोण आहेत अमृता पवार?
नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी, खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, माजी खा. स्वर्गीय वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत. पेशाने त्या अर्केटेक्चर आहेत.