(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंची सभा, नाशिकमधून शंभर बसेस, एक लाख शिवसैनिक येण्याचा अंदाज
Nashik Udhhav Thackeray : Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे नाशिकमध्ये दाखल झाले असून मालेगावकडे (Malegaon) रवाना झाले आहेत.
Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे नाशिकमध्ये दाखल झाले असून मालेगावकडे (Malegaon) रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात मालेगावात पोहचणार असून सभेची संपूर्ण तयारी झाली असून सायंकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे मालेगावी दाखल झाल्यानंतर सभेस्थळी पोहोचण्याच्या मार्गात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उध्दव ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरलेले असतांना मालेगावात काही घडामोडी घडतांना दिसत आहे. उद्धव ठाकरे मालेगाव शहरातील मोसमपुल मार्गाने शहरात दाखल होणार होते. त्या मार्गात सुरक्षिततेचे कारण देत पोलिसांकडून बदल करण्यात आला आहे. शहरातील टेहेरे चौफुली, सोयगाव, डी.के.चौक आदी मार्गाने उध्दव ठाकरे हे सभास्थळी दाखल होतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृत असा दुजोरा याबद्दल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. मात्र खा.संजय राऊत, विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीत ठाकरे हे याच 'मोसमपुल' मार्गाने शहरात दाखल होतील, यावर ठाम आहे.
दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दादा भुसेंवर ट्विटच्या माध्यमातून आरोप केल्यानंतर स्थानिक भुसे समर्थकांनी याच ठिकाणी संजय राऊत यांचा पुतळा जाळून निषेध केला होता. शिवाय याच मार्गावर दादा भुसे यांचे संपर्क कार्यालय असल्याने पोलिसांनी सुरक्षिततेचे कारण दिले आहे. मात्र खा.संजय राऊत, विनायक राऊत यांनी मात्र याच मार्गावरून उध्दव ठाकरे येतील अशी माहिती दिली आहे.
नाशिकमधून 100 बसेस
उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी नाशिकमधून पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. नाशिकमधून 100 बसेस मधून जवळपास 15000 कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहे. शहरातील वेगवेगळ्या विभागातून या बसेस मालेगावकडे रवाना होणार आहे. या सभेसाठी कार्यकर्ते उत्साही असल्याचे दिसून येत आहे. हाती झेंडे घेऊन, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते मालेगावकडे रवाना होत आहे.
जे आहेत, त्यांच्यासोबत भगवा फडकवू
दादा भुसे हे स्वार्था पोटी शिवसेना सोडून गेले. पालकमंत्री म्हणून ते भूमिका वठवण्यात ते अपयशी आहे. आज मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची सभा होत असून या सभेसाठी दीड लाखाच्यावर लोकं येणार असल्याचा दावा नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. नाशिकहून जवळपास 20 हजार कार्यकर्ते सभेसाठी जातील. तर आज ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावर बडगुजर म्हणाले कि, आयाराम गयाराम चालूच असतं..आमच्या पक्षातील लोक तिकडे जातात, तिकडचे लोक इकडे येतात..जे गेले त्यांना शुभेच्छा..जे आहेत, त्यांच्यासोबत भगवा फडकवू असा निर्धार यावेळी बडगुजर यांनी केला.