Baby Drowned : हृदयद्रावक! पालकांनो लहान मुलांकडे लक्ष द्या, नाशिकमध्ये हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा मृत्यू
Baby Drowned : घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याचा हौदात (Drowned) पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
Baby Drowned : तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर ही बातमी वाचलीच पाहिजे. अलीकडच्या काळात आई वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. नाशिकमधून (Nashik) अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याचा हौदात (Drowned) पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने नेलकटर गिळल्याची घटना ताजी असताना आता घराशेजारी असणाऱ्या हौदात पडून दोन वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील टाकळी परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याचा हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता आगर टाकळीरोड काठेमळा येथील पंचकृष्ण बंगला येथे हा प्रकार घडला. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.
नाशिक शहरातील आगर टाकळी परिसरात पंचकृष्ण बंगला येथे राहणाऱ्या रमेश चव्हाण हे पत्नी आणि दाेन वर्षांचा मुलगा आदी रमेश चव्हाण यांच्यासोबत राहतात. सायंकाळी मुलगा घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या हौदाजवळ आला. कुतूहलापोटी तो हौदावर चढत असताना त्याचा ताेल गेल्याने तो हाैदातील पाण्यात पडला, बराच वेळ होऊन मुलगा दिसत नसल्याने आई सपना चव्हाण यांनी त्याचा शोध घेतला. हौदाच्या जवळ जाऊन पाहिले असता मुलगा पाण्यात पडलेला दिसला.
नाकातोंडात पाणी गेलेल्या स्थितीत तत्काळ नजीकच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयाने त्याला सिव्हिल हाॅस्पिटल येथे नेण्यास सांगितले. आईने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅ. तडवी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यावेळी आदीच्या आईसह नातेवाइकांनी एकच हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लहान मुलांकडे लक्ष द्या
एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. सकाळी ते रात्री घर. महिला देखील घर काम आवरून जॉब करत असतात. मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून अशा घटना उघडकीस येत आहेत. काही महिन्यापूर्वी नाशिकहून लोणावळा येथे बड्डे साजरा करण्यासाठी गेलेल्या परिवारातील लहान मुलगा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या लहान मुलाने नेलकटर गिळल्याची घटना समोर आली होती. डॉक्टरांच्या साम्यसूचकतेमुळे काही तासांत नेलकटर काढण्यात यश आले होते. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते.