(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard News : नाशिकमध्ये विहिरीत पडून दोन बछड्यांचा मृत्यू, घटनांमध्ये वाढ
Nashik Leopard News : सिन्नर तालुक्यातील फुलेनगर येथे बिबट्यांच्या दोन बछड्यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या अधिवासाचा प्रश्न पुढे आला आहे.
Nashik Leopard News : अनेकदा अन्नपाण्याच्या शोधार्थ निघालेल्याबिबटे विहिरीत पडल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नाशिक (Nashik) सिन्नर तालुक्यातील (sinnar Taluka) फुलेनगर येथे बिबट्यांच्या दोन बछड्यांचा पडीक विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू (Leopard Death) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या अधिवासाचा प्रश्न पुढे आला आहे.
दरम्यान शहरासह जिल्ह्यात काही भागात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. अन्न पाण्याच्या शोधार्थ शेतातील विहिरीत पडल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच अनेकदा बिबट्यांच्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आले आहेत. दरम्यान सिन्नर तालुक्यातील फुलेनगर येथील एका शेतातील पडक्या विहिरीत पडून दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. कठाडे नसलेल्या विहिरीत मादी बिबट्याच्या मागे खेळताना किंवा पाण्याच्या शोध घेत असताना विहिरीत पडली असावी असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
फुलेनगर येथील विष्णू भगत यांचे निराळे रोडलगत विहीर आहे. त्यात तीन ते चार महिने वयाच्या बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले.याबाबत पोलिस पाटील अर्चना भगत यांनी वनाधिकारी अनिल साळवे यांना याबाबत माहिती कळवली. वनाधिकारी साळवी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्याचबरोबर पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या मदतीने खाटेला दोर बांधून बछडयांना खाटेवर बसवत बाहेर काढले दरम्यान हे बछडे चारपाच दिवसापूर्वीच विहिरीत पडले असावेत, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण या दोन्ही बछड्यांची मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वन अधिकाऱ्यांना अडवले त्यामुळे जागेवरच अंत्यविधी करण्यात आला.
मानव बिबट्या संघर्ष
एकीकडे मानव बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना, बिबट्याचा वावर वाढल्याची ग्रामस्थांची माहिती यामुळे असे निदर्शनास येते कि, बिबट्याचा अधिवास काही अंशी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच बिबट्यांचे शहरात, ग्रामीण भागात येण्याचे, धुमाकूळ घालण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाण्याच्या शोधार्थ निघाल्यानंतर रात्रीच्या अंधारात बिबटे किंवा बछडे विहिरीत पडत आहेत.
नांदगाव तालुक्यात कोल्ह्याला वाचविले !
नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या शेतातील विहिरीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ आलेला कोल्हा पडला. या कोल्ह्याला अथक प्रयत्नानंतर विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी शेतकरी गवळी यांनी वनपाल तसेच वनरक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी वन विभागाने पथकासह या ठिकाणी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने विहिरीत जाळी टाकून कसरतीने कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जवळच नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.