एक्स्प्लोर

Nashik Crime : सासरवाडीच्या त्रासापायी जावयाने स्वतःला संपवलं! नाशिकमधील घटना

Nashik Crime : नाशिकमध्ये सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) एका धक्कादायक घटना घडली आहे. सासरवाडीच्या सततच्या जाचाला कंटाळून एका जावयाने स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जावयास आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू व दोन मेव्हण्यांविरोधात उपनगर (Upnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरं तर हल्ली महिलांप्रमाणेच पुरुषांनाही मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याच्या अनेक घटना समोर आली आहेत. यापैकीच एक नाशिकची घटना, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या देवळाली गाव वडारवाडी येथे राहणारा नितीन सोहनपाल चटोले याचे दहा वर्षांपूर्वी वडनेर गेट येथील नेहा सुभाष बिडलान हिच्याशी लग्न झाले असून दोन अपत्य देखील आहेत. नेहाची आई विमला बिडलान, मेहुणे विकी व राहुल हे लग्न झाल्यानंतर सतत नेहाच्या संसारामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही एकटे राहा, असे वारंवार सांगायचे. नेहा व नितीन हे वडारवाडी येथे स्वतंत्र राहू लागले. नेहा व नितीन या पती-पत्नींमध्ये वाद-विवाद झाल्यास नेहा नेहमी मुलांना घेऊन माहेरी निघून जायची. 

दरम्यान जून 2021 मध्ये नेहा अशीच माहेरी निघून गेल्यानंतर सुरक्षा विभागात तक्रार दिली होती. यावेळी समेट घडवताना नेहाची आई विमला हिने जावई नितीनला सर्वांसमोर बोलून त्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. तेव्हापासून तो नैराश्यामध्ये राहत होता. दोन दिवसांपूर्वी नितीन व नेहामध्ये सासू विमला यांच्या संसारातील हस्तक्षेपामुळे भांडण झाले. रागाच्या भरात नितीन यांनी पत्नी नेहाला चापट मारली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी देवळाली गाव सुंदर नगर चौकी येथे नितीनसह पत्नी नेहा या दोघांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर नितीन यांनी घरी जाऊन छताला गळफास घेत स्वतःला संपवल्याची घटना घडली. 

या प्रकरणी मुलगी व जावयाच्या संसारामध्ये हस्तक्षेप करून पती-पत्नींमध्ये झालेल्या वादात समेट घडवण्यासाठी जावायला मुलीच्या पाया पडण्यास लाऊन सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील नाशिक शहरात अशा प्रकारच्या घटना घडल्या असून ही प्रकरणे चिंतेची बाब आहे. 

सासरवाडीकडून मानसिक त्रास 
दरम्यान मागील वर्षी आगस्ट महिन्यात नाशिकच्या ओझर शहरातही अशीच घटना समोर आली होती. या प्रकरणात पीडित तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ काढत तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तर पत्नी व मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावयास दमदाटी करून घरातून हाकलून दिल्याने नैराश्य येऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना पंचवटी येथे घडली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget