Nashik Gulabrao Patil : शिंदे गट आणि भाजप नाशिक पदवीधरमध्ये भाकरी फिरवणार, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
Nashik Gulabrao Patil : पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची बैठक होणार आहे.
Nashik Gulabrao Patil : पदवीधर मतदार संघाच्या (Nashik Graduate Constituency) पाच जागांसाठी बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची (BJP) बैठक होणार आहे. पदवीधर मतदार संघाच्या कोणत्या उमेदवारासाठी काम करायचे याच्या निर्णयानंतर ज्या सूचना आम्हाला प्राप्त होतील, त्या उमेदवारासाठी काम करू अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे.
नाशिक (Nashik) पदवीधरसह राज्यतील इतर पदवीधर मतदारसंघात निवडणूक सुरु असून येत्या तीस जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र असून दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार यात शंका नाही. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पक्षाची भूमिका लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार एक दोन दिवसात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा मिळणार हे समोर येणार आहे. त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी संबंधित उमेदवारासाठी काम करू अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी उद्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची बैठक होणार असून विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान पदवीधर मतदार संघासाठी कुठल्या उमेदवारासाठी काम करायचे याबाबत बैठकीनंतर निर्णय होणार असून ज्या सूचना मिळतील, त्या बैठकीला मला सुद्धा निमंत्रित केलेल आहे. त्या बैठकीत जो निर्णय त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारासाठी आम्ही काम करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
नाशिक पदवीधरमध्ये भाजपची भूमिका महत्वाची...
नाशिक पदवीधरमध्ये सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत आहे. एकीकडे शुभांगी पाटील ह्या काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर दुसरीकडे गेल्या तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज मिळूनही त्यांनी सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरल्याने मोठी राजकीय घडामोड घडली. आता भाजपमधून आलेल्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला तर सत्यजित तांबे हे काँग्रसेचे असताना आता भाजप त्यांना पाठिंबा देणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.