Gulabrao Patil : आता भाऊ राहायचं नाहीतर पाणीवाला बाबा व्हायचंय, मंत्री गुलाबराव पाटील यांचा संकल्प
Gulabrao Patil : जिल्ह्यातील सर्व लोकांना पाणी मिळू लागले आहे, हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण राहिला आहे.
Gulabrao Patil : मला आता भाऊ राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचा आहे. सरकारने जल जीवन मिशन (Jal Jivan Mission) योजने अंतर्गत पाणी पुरवठा (Water Supply) करण्याचे जे उदिष्ट ठेवले आहे ते पूर्ण करण्याचा, बाळासाहेबांची शिवसेना गावागावापर्यंत पोहोचून जळगाव जिल्हा भगवामय करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले आहे.
संभाजी राजे (Sambhajiraje) हे आमच्या साठी धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहणार आहे. त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या बाबत अस बोलण उचित नाही, संभाजीराजे यांनी धर्मासाठी काय नाही केले. त्यांचे डोळे काढले गेले,त्यांचा किती छळ करण्यात आला,तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत आणि धर्मवीरच राहणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे. अधिवेशनात केवळ आरोप प्रत्यारोप झाले प्रश्न सुटले नाहीत असा खडसे यांनी आरोप केला होता. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. खडसे यांचा बोदवडचा प्रश्न सुटला आहे. त्यांच्याकडे आता प्रश्नच राहिले नाहीत, ते तर काम करण्याचे महामेरू आहेत असा खोचक टोला लावत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे
अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचं शरद पवार यांनी म्हटल होते, त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की, कोणत्याही प्रकारची कारवाई ही लोकप्रतिनिधी करत नसतात, तर त्यासाठी एजन्सी काम करत असते. जामीन ही कोर्ट देत असते त्यामुळे शरद पवार यांचे म्हणणे उचित नाही. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकरण करू नये, अशी आपली नम्र विनंती असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.
आयुष्यातील आनंदाचा क्षण
दुर्गम भागात पाण्याच्या योजना आम्ही सुरू केल्यानंतर लोकांना पाणी मिळू लागले आणि त्यांचा आम्हाला मिळू लागलेला प्रतिसाद हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण राहिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत हा ज्यावेळी हा प्रकार घडला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही सांगितलेले ऐकले नाही, त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हा आपल्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर 'बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सीडेंट हो जायेगा' हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली आहे. गाडीचा वेग जर जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडीबरोबर चालवतो, असे म्हणत अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.