(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik PFI : 2047 पर्यंत भारत संपूर्णत मुस्लिम राष्ट्र करायचे होते, पीएफआयच्या कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्लॅन
Nashik PFI : नाशिकमध्ये (Nashik) पीएफआयच्या (PFI) पाच जणांची न्यायालयाने कारागृहात (Jail) रवानगी केली आहे.
Nashik PFI : दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पीएफआयच्या (PFI) पाच जणांची चार दिवस एटीएस काेठडी राखून ठेवत न्यायालयाने कारागृहात (Jail) रवानगी केली आहे. म्हणजे या पाच जणांकडून धक्कादायक माहिती समोर येत असून 2047 पर्यंत भारत संपूर्ण मुस्लिम राष्ट्र करायचे होते. यासह आयोध्यातल्या राम मंदिराच्या (Ram Mandir) जागी पुन्हा बाबरी मशिद उभी करण्यासाठी विघातक कार्यवाही करण्याचा त्यांचा प्लॅन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), कोल्हापूर, औरंगाबादसह (Aurangabad) राज्यभरातून दहशतवादी कारवाया करण्याच्या संशयावरून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विराेधी पथकाने अटक केलेल्या पाॅप्युलर फ्रंड ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पाच संशयितांना अटक करण्यात आली हाेती. पाेलिस काेठडीची मुदत संपल्याने त्यांना जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) हजर केले असता त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, संघटनेच्या सदस्यांकडून 2047 पर्यंत भारत हे संपूर्ण मुस्लिम राष्ट्र करण्याचे उद्धिष्टे असल्याचे व विदेशातही प्रशिक्षण घेवून भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा मनसुबा असल्याचे तपासात उघडकीस झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
दरम्यान देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुरवातीला बारा दिवस आणि त्यानंतर 14 दिवस एटीएस कोठडी सुनावण्यात आली. ही कोठडी संपल्यानंतर सोमवारी पाचही जणांना एटीएसने न्यायालयात हजर केली. यावेळी 3 ऑक्टोंबर रोजी केलेल्या दाव्यानुसार तपासातील मुद्दे मांडून पाचही जणांच्या विघातक कृत्यांच्या प्रयत्नासंदर्भातील माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान पीएसआय संदर्भात तांत्रिक विश्लेषणातून तपास करण्यात आला. त्याद्वारे मिळालेली माहिती न्यायालय सादर करण्यात आली. त्यानुसार हार्ड डिस्कसहित मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे. चार दिवस राखून ठेवलेल्या कोठडीत वेळोवेळी तपास केला जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर (Ajay Misar) यांनी दिली.
दहशतवाद्यांना पैसे पुरवण्यासह समाजात अशांतता पसरवण्यास कट असल्याचा संशयात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मालेगावातून दोन राज्यातून इतर तिघांना अटक केली होती. त्यामध्ये पीएफआय या वादग्रस्त संघटनेच्या मालेगाव जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर रहमान सैय्यद अहमद अन्सारी यासह पुण्यातील उपाध्यक्ष अब्दुल कयूम बादुल्ला शेख, वरिष्ठ नेता रझी अहमद खान सदस्य वसीम अजीम उर्फ मुन्ना शेख आणि विभागीय सचिव मौला नशीब साब मुल्ला यांचा समावेश आहे.
सोमवारी झाली सुनावणी
सोमवारी जिल्हा व सत्र ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली. यावेळी तपासी पथकाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करीत तपासाची माहिती दिली. संशयितांचा सदस्यांचा व्हॉट्स अँप ग्रुप असून या ग्रुपचा ॲडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, अमिराती, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवाद विरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची छाननी करत आहे. मालेगाव, बीड, नांदेड येथून पाच संशयितांना नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सुरुवातीस १२ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.