Nashik News : कडक सॅल्यूट! नाशिक झेडपी सीईओ मित्तल आदिवासी मुलींसाठी ठरल्या तारणहार
Nashik News : नाशिक (Nashik) झेडपी सीईओ आशिमा मित्तल (CEO Ashima Mittal) यांचा पाठपुराव्याने टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने आदिवासी मुलींना कायमची नोकरी देऊ केली आहे.
Nashik News : सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून गत महिन्यांपर्यंत पालघरमध्ये (Palghar) कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (CEO Ashima Mittal) यांचा पाठपुराव्याने टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीने पालघरच्या 197 आदिवासी मुलींना कायमची नोकरी देऊ केली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आदिवासींच्या (Trible) जीवनातही परिवर्तन आणण्यासाठी या धरतीवर प्रकल्प राबवण्यास संकल्प त्यांनी केला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या पदभार घेण्यापूर्वी सीईओ मित्तल या पालघर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून कार्यरत होत्या. तेथील आदिवासी मुलींसाठी त्यांनी नामांकित कंपन्यांसोबत समन्वय साधून एम्प्लॉयमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले होते. या ड्राइव्हमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स या बेंगळूर येथील कंपनीने सहभागीत सुमारे 610 आदिवासी मुलींची संवाद साधला. यातील परीक्षा व मुलाखतीच्या तीन टप्प्यानंतर कायमस्वरूपी नोकरीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. होसुर बेंगलोर येथील कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये नव्या नोकरीवर रुजू होण्यासाठी 88 मुलींची पहिली तुकडी नुकतीच रवाना झाली. या उपक्रमासाठी समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मित्तल यांची नाशिकला जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली झाली. त्यानंतरही पालघर मधील अखेरच्या टप्प्यातील या उपक्रमाचा पाठपुरावा त्यांनी केला आणि होसुर येथे नव्या संधीसाठी रवाना होणाऱ्या मुलींचे मनोबल वाढवले. नोकरीसह या मुली तेथे बीएससी मेकॅनिकल इन मॅन्युफॅक्चरिंग सायन्स मध्ये पदवीदेखील घेणार आहेत.
दरम्यान जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून मुलींना शुभेच्छा दिल्या असून आगामी करिअरसाठी जीव तोडून मेहनत करा असेही त्यांनी म्हटले आहे. सीईओ मित्तल यांनी केलेल्या ट्विट मध्ये त्या म्हणतात कि, 'टाटा इलेक्ट्रॉनिक्सने पालघरमधील 197 आदिवासी मुलींना त्यांच्या सर्व उत्पादन प्रकल्पासाठी भरती केले आहे. हे सांगताना खूप आनंद होत आहे. 88 जणांची पहिली तुकडी आज होसूरमध्ये दाखल झाली. आयटीडीपी डहाणू आणि जव्हार यांच्या प्रयत्नाने ते शक्य झाले! तुम्हा मुलींना मनःपूर्वक शुभेच्छा! उंच उडवा!' असे आशयाचे ट्विट करून मुलींच्या पंखांना त्यांनी बळ दिले आहे.
पालघर मध्ये कार्यरत असताना तेथील परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सोशल ड्राईव्ह घेतला. यातील 197 मुलींची निवड कायमस्वरूपी नोकरीसाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्सने केली आहे. अनुभव घेताना या मुली त्यांची पदवी देखील पूर्ण करू शकणार आहेत. नाशिक मधील आदिवासी भागात याच धरतीवर काही प्रयोग राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आशिमा मित्तल सांगितले.