एक्स्प्लोर

Nashik Black Spot : बारा जणांचा बळी घेणारा 'ब्लॅक स्पॉट' झाला ट्रॅफिक फ्रेंडली, गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क 

Nashik Black Spot : नाशिकमध्ये (Nashik) बारा जणांचा बळी घेणारा 'ब्लॅक स्पॉट' ट्रॅफिक फ्रेंडली झाला असून गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क करण्यात आले आहे.

Nashik Black Spot : नाशिक (Nashik) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या बस अपघाताच्या (Nashik Bus Fire) पार्श्वभूमिवर मनपाच्या बांधकाम विभागाने ऑक्टोबर रोजी गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रंबल स्ट्रीप) बसविली आहे. तपोवन बाजुकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजुच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत तीन बाजुंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढणेसाठी नगरनियोजन व अतिक्रमण विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यातील काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढुन घेण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान नाशिक बस अपघातानंतर यंत्रणा कार्यान्वित झाली असून चौफुलीनजीक असलेल्या अतिक्रमित दुकानांवर कारवाई करण्यात येत आहेत. यामध्ये जे स्वतःहून अशी बांधकामे काढून घेणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत तत्काळ उपाययोजने अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्यात आले आहेत, पॅच वर्क करण्यात आले आहे. या चौकात येणारी वाहनांचा वेग मर्यादित होण्याच्या दृष्टीने औरंगाबाद रोडला जाऊन मिळणारा मनपाच्या रस्त्यावर गतिरोधक, रंबलर उभारण्यात येऊन अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे. 

Nashik Black Spot : बारा जणांचा बळी घेणारा 'ब्लॅक स्पॉट' झाला ट्रॅफिक फ्रेंडली, गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क 

नाशिक महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी या सर्व कामांची पाहणी केली. लवकरच येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर दुभाजकही बांधला जाणार असून महावितरण अधिका-यांनी डीपी बसवण्याबाबत पाहणी केली. नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. नांदूर नाक्यावरुन येणा-या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळचे विद्युत रोहित्र हटवण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. 

Nashik Black Spot : बारा जणांचा बळी घेणारा 'ब्लॅक स्पॉट' झाला ट्रॅफिक फ्रेंडली, गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क 

इतर चौकांमध्येही सुधारणा होणार 
महत्वाची बाब म्हणजे मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागात बीएम मटेरीअलने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर उड्डाणपूलवरही खड्डे बुजवून पॅच वर्क करण्यात आले आहे. एम. जी. रोडवरही खडी-डांबर टाकून (एमपीएम) खड्डे बुजवण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार होतील याची काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget