Nashik 31st Celebration : वर्षाचा नाही तर आयुष्याचा शेवट होईल म्हणून... नाशिक पोलिसांकडून थर्टी फस्टसाठी कानमंत्र
Nashik 31st Celebration : थर्टी फस्टला हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना नाशिक पोलिसांनी कानमंत्र दिला आहे.
Nashik 31st Celebration : थर्टी फस्ट (31st December) आणि नववर्षाच्या (new Year) पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तगडा बंदोबस्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी केला आहे. मात्र दरवर्षी थर्टी फस्टला नागरिक उत्साहात पण मद्य प्राशन करून गाड्या पळवतात. यंदाही अपघात होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते चौक आणि उपनगरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय डंक अँड ड्राईव्ह आणि वेगात वाहने पळविणाऱ्यांना नाशिक (Nashik) पोलिसांनी आयुष्याचा कानमंत्र दिला आहे.
नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक हॉटेल्स रिसॉर्टवर पार्टीच आयोजन केले जाते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीत अनेकजण मद्यप्राशन करतात. त्याच अवस्थेत वाहन देखील चालवतात. मात्र अशावेळी अपघाताची शक्यता असल्याने मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवणे गुन्हा असून मोठा अपघात होऊन जीव गमावल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांसह तरुणांनी ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देता नवीन वर्षाचे स्वतःसाठी नाशिक करण वेगवेगळे बेत आखले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिकची तरुणाई आतुर झाले आहे. अलीकडे थर्टी फर्स्ट एक सेलिब्रेशन म्हणून साजरी करायची परंपरा देखील रूढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हॉटेल्स ही सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे शहरासह जिल्हाभर नाकाबंदी केली गेली असून पोलीस बेशिस्त व मद्यपी वाहन चालक, समाजकंटकांवर कारवाई करणार आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यात पोलीस ठाणे बंदोबस्तात येणार करण्यात आला असून गुन्हे शाखा, वाहतूक शाखेसह पोलिस अधिकारी बंदोबस्तात उपस्थित आहेत.
दरम्यान मद्यप्राशन करून वाहने चालवल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेता शहरातील विविध रस्त्यांवर नाकाबद्ध नाकाबंदी करण्यात आली आहे. शंभरहुन अधिक ब्रिथ अँनालायझर आणि प्लास्टिक पाईप खरेदी केले आहेत. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन चालकांची यंत्राद्वारे तपासणी करून मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर हॉटेल अथवा बंदिस्त जागेत पार्टीचे आयोजन करण्यात करता येते. मात्र रस्त्यावर पार्टी करणे, तसेच रस्त्याच्या सार्वजनिक ठिकाणी बसून मद्य प्राशन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवीन वर्षाचे स्वागत उत्साह साजरे करताना नियमांचे पालनही करावे. मद्य पान करून वाहन चालवु नका. त्यामुळे चालक स्वतः सह रस्त्यावर इतर नागरिकांच्या जीव धोक्यात घालत असतो. अपघात झाल्यास स्वतः कुटुंबाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे शांततेत नववर्षाचे स्वागत करा असे आवाहन नाशिक पोलीस आयुक्तांनी केले आहे.