एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवा प्लॅन, नाशिक, पोलीस, मनपा रस्ते प्राधिकरण एकत्र 

Nashik News : नाशिक (Nashik) शहरात लोकसंख्या वाढत असून दिवसेदिवस शहरातील वाहनांचे (Traffic) प्रमाणही वाढत आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या दिवसेंदिवस वाढत असून ही कोंडी फोडण्यासाठी मुख्य उड्डाण पुलास काही ठिकाणी समांतर छोटे उड्डाण पूल (Bridge) निर्माण करण्याचा सल्ला देतानाच उड्डाणपुलामुळे वाहतूक सुलभ होऊ शकेल असा विश्वास नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner) यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक शहरातील (Nashik Transport) वाहतूक सुलभ व सुरळीत होणे करता पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व महामार्ग प्राधिकरण यांचे संयुक्त बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला अमोल तांबे उपायुक्त श्रीमती पौर्णिमे चौगुले उपायुक्त वाहतूक यांनी नाशिक शहरातील वाहतुकीच्या समस्या उपाय याबाबत व मुख्यत्वे करून द्वारका मुंबई नाका व इंदिरा नगर बोगदा या ठिकाणांवरील वाहतूक समस्या कशा दूर होतील याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मुख्य उड्डाण पुलास काही ठिकाणी समांतर छोटे उड्डाणपूल निर्माण केल्याने वाहतूक सुलभतेस कशी मदत होईल. याबाबत मार्गदर्शन केले. 

तसेच मुंबई नाका (Mumbai Naka) येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई नाका सर्कलची रुंदी कमी करणे व त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या प्रस्तावावर जलद कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महानगरपालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी उडणपलावरून व महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे पावसाचे पाणी व चिखल सतत वाहून रस्त्यावर येतो. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण यात वाढ झाल्याचे सांगितले. त्यामुळेच महामार्ग प्राधिकरण यांनी त्वरित यावर उपाययोजना करावी, याबाबत सूचना दिल्या. तसेच सध्या असलेले चालू असलेले रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे कार्य हे पाऊस ओसरल्यानंतर अधिक जलद गतीने होईल, असेही सांगितले. 

नाशिक पोलीस, नाशिक महानगरपालिका व महामार्ग प्राधिकरण यांनी एक समिती गठीत करून वाहतूक नियोजनाबाबत प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्याचे ठरले. बैठकीनंतर पोलीस आयुक्त, नाशिक शहर महानगरपालिका आयुक्त यांनी इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका सर्कल व द्वारका येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नाशिक वाहतूक सुरळीत करण्याकरता प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची बैठक होऊन नाशिक वाहतूक सुलभतेकरता नियोजनात्मक पावले उचलण्यात येत आहेत. 

वाहतूक कोंडी नित्याची 
दरम्यान नाशिक शहरात लोकसंख्या वाढत असून दिवसेदिवस शहरातील वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येचा सामना करावा लागत आहे. यासाठी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा, वाहतूक बेटे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र वाहतूक कोंडी सुटण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. दरम्यान पहिल्यांदा नाशिक शहरातील तीन महत्वाचे विभाग एकत्र येऊन यावर तोडगा काढत असल्याने नाशिककरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache pan : 'द लायब्ररी' च्या निमित्ताने नितीन रिंढेशी गप्पा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कानात कुजबुजले, राज ठाकरे सुद्धा चांगलेच हसलेSharad Pawar Bheemthandi Yatra : भीमथडी यात्रेला शरद पवारांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
election commission of india : हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
K P Patil : ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Embed widget