Nashik News : नाशिकच्या आश्रमांबाबतचा प्रश्न नागपूर अधिवेशनात मांडणार, नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण
Nashik News : नाशिकच्या म्हसरूळ आधार आश्रमातील प्रकरण नागपूर अधिवेशनात मांडणार असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) आधार आश्रमबाबतची (Aadhar Ashram) माहिती घेतली असून तरुणींच्या पुनर्वसनासाठी आढावा घेऊन मदत होते आहे. सरकार अथवा खासगी संस्था यांची माहिती असावी, अन्य ठिकाणी ही अशा घटना घडल्यास, सामाजिक संस्थांनी मागे उभं राहावं. आश्रमातील तरुणींच्या सुरक्षेची काय व्यवस्था केली याची माहिती घेणार असून याबाबत नागपूर अधिवेशनात (Nagpur Winter Session) ही चर्चा करणार असल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आल्या असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी नाशिक पोलिसांकडून म्हसरूळ आश्रम प्रकरणाबाबत माहिती घेतली. यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या कि, आश्रमातील मुलींच्या पुनवर्सनासाठी योग्य त्या उपाययोजना कारण आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. अशा काही घटना निदर्शनास आल्यास स्थानिक संजयक संस्थांनी पुढाकार घेऊन संबंधित पीडितांच्या मागे उभं राहणे महत्वाचं ठरते. या प्रकरणाची चर्चा नागपूरला केली जाईल, या प्रकरणाचा योग्य तपास होऊन इतर आश्रमांबाबत काय स्थिती हे तपासले जाईल, असे स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र कर्नाटक वादावर त्या म्हणाल्या कि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळणे महत्वाचे असून न्याय मिळावा यासाठी धडपड सुरू आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आहे, यात शेती अन्य विषयांवर विधिमंडळात चर्चा होईल, दिवसभर काम झालं तर अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, विधिमंडळावर जनतेचा विश्वास आहे. सध्या देवेंद्र फडणवीस हे लव्ह जिहाद विषयी अभ्यास करत आहेत, योग्य वेळी निर्णय होईल, त्याचबरोबर लव्ह जिहादसाठी समिती करण्यात आली ही चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे अशा घटनांमुळे समाजात थोडीफार जागृती झाली तर बरं होईल. दुसरीकडे राज्यात ईडीचे सीबीआयचे धाडसत्र सुरु असून या तपास यंत्रणा, स्वतंत्रपणे काम करतात, गुन्हे तपास आणि आणि केस चालवण्यासाठी कालमर्यादा ठरावी, एवढीच अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.
नागपूरला अधिवेशन होत असून यामध्ये अनेक चर्चाना उधाण येणार आहे. नागपूरला चांगलं काम होत, जनतेची अपेक्षा असते, थोडं जास्त हवं होत. नागपूरला 10 वर्षात ज्या घोषणा झाल्या, त्यांच्या अंमलबजावणीचे काय झाले? याचीही चर्चा अधिवेशनात व्हायला व्हावी. म्हणजेच मतभेदांच्या पलीकडे जाऊन विधिमंडळात चर्चा व्हावी. तर पुरस्कार रद्द करण्यावर त्या म्हणाल्या कि, पुरस्कार काढून घेतल्याने आणखी अपमान होतो, सांस्कृतिक विभागाने एवढं असंस्कृत असू नये. तसेच नाशिकच्या प्रख्यात डॉक्टर प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षकांशी चर्चा झाली असुन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच जातपंचायत संदर्भात जागृती व्हावी यासाठी अधिवेशना दरम्यान गृहमंत्र्याशी बोलणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.