Nashik Navratri : नाशिक एसटी विभागाला देवीसह कोजागिरी पावली, तीन कोटींहून अधिक उत्पन्न
Nashik Navratri : एसटी महामंडळाच्या (ST) नाशिक (Nashik) विभागाला नवरात्रीत तब्बल तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
Nashik Navratri : यंदा कोरोनाचे (Corona) मळभ दूर झाल्यानंतर सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होते आहे. यामधेय नवरात्री (Navratri), दसरा याचबरोबर कोजागिरी पौणिमा (Kojagiri Paurnima) जल्लोषात साजरी करण्यात आली. या सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक (Nashik) विभागाद्वारे पुरवण्यात आलेल्या बससेवेचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. यातून एसटी महामंडळाच्या (ST) नाशिक विभागाला तब्बल तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण उत्सवावर बंदी होती. त्यामुळे नागरिक घरातच सण उत्सव साजरे करत होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव दूर होऊन निर्बंधमुक्त उत्सव साजरे आहेत. श्रावण महिन्यापासून सुरु झालेले सण उत्सव आजही निर्बंधमुक्त वातावरणात सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नवरात्री येऊन गेली. या नवरात्रीत जल्लोषात सगळ्यांनी आनंद घेतला. शिवाय यंदा प्रथमच सप्तश्रुंगी गड भाविकांसाठी दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर नवरात्री तसेच कोजागिरी पौणिमेसाठी नाशिक जिल्ह्यातून असंख्य बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेमुळे सप्तशृंगी देवीसह कोजागिरी पौणिमा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पावली असून तब्बल 03 कोटींचे उत्पन्न झाले आहे.
कोरोनाचे दोन वर्ष सामान्य लालपरी आगारात बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने अनेक महिने कोरोना आटोक्यात आल्यानंतर बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तर कोरोनामुळे दोन वर्ष नागरिक सण साजरे करू शकले नाहीत. त्यामुळे नवरात्रीला कोणताही मोठा कार्यक्रम न होता, घराघरात घटस्थापना करण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाचा धोका आटोक्यात आल्याने यंदा नवरात्रीला महाराष्ट्रातील अनेक देवी तीर्थस्थळी भाविकांची वर्दळ पाहायला मिळाली. तर आपल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर महाराष्ट्रातून भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान यंदा नवरात्री ते कोजागिरी या कालावधीत नाशिक विभागातील एसटी महामंडळाने भाविकांना बस सेवा पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सप्तशृंगी देवी दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यातून बसेस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. नवरात्रीला 18 हजार 721 फेऱ्या करण्यात आल्या असून 7 लाख 82 हजार 592 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. या माध्यमातून एसटीला जवळपास 2 कोटी 53 लाख 28 हजार 473 रुपयांचे भरघोष उत्पन्न मिळाले आहे. तर कोजागिरीला 5 हजार 250 फेऱ्या करण्यात आल्या असून 2 लाख 29 हजार 693 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. तर सुमारे 82 लाख 15 हजार 137 इतके उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर नवरात्री व कोजागिरी पौणिमेच्या माध्यमातून एसटीला देवी पावली आहे.
10 लाख भाविकांचा प्रवास
दरम्यान नाशिक विभागाने नवरात्री व कोजागिरीसाठी सुरू केलेल्या बसेस मधून जवळपास १० लाख प्रवाशांनी देवीचे दर्शन घेतले. यामध्ये एसटी बसेसच्या एकूण 23 हजार 971 फेऱ्या झाल्या. तर जवळपास 3 कोटी 35 लाख 43 हजार 610 इतके उत्पन्न मिळाले आहे. तसेच 10 लाख 12 हजार 285 प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतला आहे. याबाबत नाशिकचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील म्हणाले की नवरात्री व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुरू केलेल्या एसटी बसेसला महामंडळाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकहून जवळपास दहा लाखांहून अधिक प्रवाशांनी एसटतुन प्रवास केला असून आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देखील एसटी महामंडळ नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.