Nashik News : नाशिकचे गंगापूर धरण 96 टक्क्यांवर, मात्र शहरात शनिवारी, रविवारी पाणी बाणी
Nashik news : नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) 96 टक्क्यांवर पोहचले असताना मात्र नाशिककरांना पाणीबाणी (Water supply) सहन कारवाई लागत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) 96 टक्क्यांवर पोहचले असताना मात्र नाशिककरांना महिन्यातून दोन तीनदा पाणीबाणी सहन कारवाई लागत आहे. आता इगतपुरीतील (Igatpuri) मुकणे आणि गंगापूर धरणावरील नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) पंपिंग स्टेशन येथील दुरुस्ती कामानिमित्त शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र दार महिन्याला दुरुस्तीच्या कामांमुळे नाशिककरांना ड्राय डे (Dry Day) करावा लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बरोबर महावितरणशी संबंधित रोहित उपकेंद्रांची अवस्था नाजूक असल्याने दार महिन्याला पाणी पुरवठा होताना पाहायला मिळते. यामुळे नाशिकरांना याचा फटका बसत असून अतिरिक्त पाण्याची साठवणूक करावी लागत आहे.
अशातच आता मुकणे धरणावरील मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी 33 के . व्ही . वीजपुरवठा केला जातो. या सबस्टेशन मधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत पंपिंग स्टेशन पॉवर सप्लाय खंडित केला जाणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन मधील दुरुस्तीची कामे देखील याचवेळी हाती घेतली जाणार असल्यामुळे शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आजचा धरणसाठा
गंगापूर धरण समूहातील धरणांचा जलसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये कश्यपी 99, गौतमी गोदावरी 99, आळंदी 100, गंगापूर 96 वर पोहचले आहे. तर दारणा धरण समूहापैकी दारणा 97 टक्के भावली 100, मुकणे 98, वालदेवी 100, कडवा 89, भोजापूर 100 टक्के भरले असून गिरणा खोरे धरण समूहात चणकापूर 76 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, गिरणा धरण 93 टक्के भरले असून गिरणा धरणातून देखील दोन दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पुनद प्रकल्प 82 टक्के, माणिकपुंज धरणात 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील धरणांतील एकूण जलसाठा 93 टक्क्यांवर पोहचला आहे.