Nashik News : नाशिक मनपात लाचखोरीचं प्रमाण वाढतंय; लिपिकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Nashik News : नाशिक विभागातील लाचखोरीचे प्रमाण नवीन वर्षातही कायम असल्याचे दिसून येत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) विभागातील लाचखोरीचे (Bribe) प्रमाण नवीन वर्षातही कायम असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील महापालिकेच्या महिला लिपिकाने 500 रुपयाची लाच घेतल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड आल्यानंतर पुन्हा एकदा मनपातील (NMC Workers) एका कर्मचाऱ्याने लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे.
नाशिक शहरातील महापालिकेच्या (Nashik NMC) पश्चिम विभागातील एका लिपिकासह शिपायाला राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) या पालिका मुख्यालय पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून 1800 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत बेड्या ठोकण्यात आले आहेत. तक्रारदाराला चहा टपरीचे नाशिक महापालिका हॉर्कर्स झोनमध्ये (Hawkers Zone) बायोमेट्रिक नोंदणी करून पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात पश्चिम विभागातील जाहिरात व परवाना विभागाच्या लिपिक तथा कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ यासह प्रवीण अर्जुन इंगळे या शिपायाने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 1800 रुपये घेण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या सापळा कारवाईत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस नाईक किरण अहिरराव, राजेंद्र गीते, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्याविरुद्ध विभाग कारवाई करत असतो. शासकीय लोकसेवक त्याचे काम कायदेशीरपणे प्रामाणिकरीत्या करत असेल आणि ते काम बेकायदेशीररित्या करून घेण्यासाठी कोणी त्याला लाच देण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा तो पण एक अपराधाच आहे. ज्या प्रकारे लाच घेण्यासंदर्भात किंवा मागण्या संदर्भात एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल होतो. त्याच प्रकारे लाच देण्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीविरुद्ध लाभ देण्याचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करून देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल. तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे अथवा तक्रार नोंदवावी अशी आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना वारंवार करण्यात येते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नाशिक पदवीधर निवडणूक : दोन दिवस उलटूनही अद्याप एकही नामनिर्देशन अर्ज दाखल नाही!