Nashik Temperature : नाशिकचं तापमान दहा वरून थेट बारावर, तर कॅलिफोर्नियाचं तापमान घसरलं!
Nashik Temperature : नाशिक शहरात दोन दिवसांपासून हुडहुडी वाढली असताना पुन्हा तापमानात दोन अंशांनी वाढ झाली
Nashik Temperature : नाशिक (Nashik) शहरात दोन दिवसांपासून हुडहुडी वाढली असताना पुन्हा तापमानात (Temperature) दोन अंशांनी वाढ झाली आहे. काल नाशिक शहरात 10.2 अंश तापमानाची (Mercury) नोंद करण्यात आली. तर आज हेच तापमान 12.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. तर नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडमध्ये 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मागील शनिवारपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात गुलाबी थंडीचे आगमन पुन्हा झाले. शनिवार रोजी 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे नाशिककरांना चांगलीच थंडी जाणवली. सकाळपासूनच गार वाऱ्याच्या झुळकेसह आल्हाददायक वातावरणाची अनुभूती पाहायला मिळाली. तर ग्रामीण भागात शेकोट्यांचे प्रमाणही वाढले. त्याचबरोबर ही थंडी सलग तीन दिवस असल्याने नाशिककरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता आला. त्यामुळे सकाळी सहा पर्यंत जॉगिंग ट्रॅकवर जाणारे नाशिककर मात्र सलग तीन दिवस आठ पर्यंत येऊ लागले. मात्र आज पुन्हा तापमानात वाढ होऊन 10 अंशावरून बारा अंशावर तापमानाची नोंद झाली.
नाशिकसह जिल्ह्यात थंडी गायब झाल्याचा जाणवत असताना अचानक मागील तीन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज मात्र काहीसा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये अवघ्या 7 अशांवर पारा येऊन थांबला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अचानक थंडी वाढल्यामुळे उबदार कपड्याना मागणी वाढल्याचे चित्र आहे. मात्र वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह हरभरा, मसूर, वाटाणा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
थंडी सुरु झाल्यापासून वेळोवेळी वातावरणात बदल होऊन तापमानात कमी अधिक प्रमाणात बदल होऊन पारा घसरत आहे. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने कमी झाल्याचे जाणवत होते. मागील काही दिवसांतील तापमानाची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते कि, मागील शुक्रवारी तापमान 13 अंशावर होते, त्यानंतर शनिवारी पारा घसरून हे तापमान 10.3, रविवारी थेट 9.8 अंशावर तर सोमवारी 10.2, त्यानंतर आजच तापमान हे 12.4 अंशावर आले आहे., त्यामुळे सातत्याने थंडीत कमी आधी प्रमाणात बदल होत असून अचानक तापमान वाढत तर कधी अचानक थंडी जाणवायला लागली आहे. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला काल 7.6अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज थेट 7 अंशावर पारा घसरला आहे.
दर दहा दिवसांनी तापमानात घट
राज्यात थंडीला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच थंडीची लाट आलेली होती. दरम्यान थंडीच्या सुरवातीला ओझरमध्ये सर्वात कमी म्हणजे 5.7अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ओझर हे सर्वात थंड शहर म्हणून नोंद झाली. अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा तसेच विदर्भात ही थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. राज्यात आकाश स्वच्छ असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात थंडी असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात दर दहा दिवसांनी तापमानात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.