एक्स्प्लोर

Nashik Crime : उपचारासाठी येणाऱ्या भक्तानेच मांत्रिक महिलेला संपवलं! संशयितास दहा मिनिटात अटक, नाशिकमधील घटना 

Nashik Crime : नाशिकच्या शिंदे गावात मांत्रिक महिलेला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime : नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे गावात (Shinde Village) मांत्रिक महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिक महिलेकडे उपचारासाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून निर्घृण खून (Women Murder) केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडून अवघ्या दहा मिनिटात संशयितास अटक करण्यात आली आहे. 

नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात सर्रास खुनाच्या घटना उघडकीस येत असून महिनाभरातच तीन महिलांच्या खुनाच्या (Murder Case) घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच नाशिकरोड (Nashikroad Police) जवळील शिंदे गावात मंत्री महिलेच्या हत्येची घटना समोर आली आहे. येथील शिवरत्ननगर भागात राहत असलेल्या जनाबाई भिवाजी बर्डे असे हत्या झालेल्या मांत्रिक महिलेचे नाव असून, निकेश दादाजी पवार असे तिची हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जनाबाई बर्डे ही महिला नाशिकजवळील शिंदे गावात राहत्या घरात देवाची गादी चालवत होती. ही गादी चालविताना जनाबाई बर्डे तिच्याकडे येणाऱ्या पीडितांचे निवारणासाठी उपाय सुचविण्यासोबत, त्यांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्ग सुचवित, त्यांच्या अडचणी निवारणासाठी तोडगा सांगत असल्याने, तिच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिक येत होते.

दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये जनाबाई बर्डे या दैवी शक्तीने उपचार व उपाय करीत असल्याचा समज असल्याने आजूबाजूच्या परिसरातील पीडित तिच्याकडे उपायांसाठी येत असत. याच पीडितांमधील संशयित निकेश दादाजी पवार हा ही एक होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर दैवी मार्गाने उपाय करण्यासाठी जनाबाई यांच्याकडे येत होता. मात्र, त्याला जनाबाईने सांगितलेल्या उपायाचा काहीही फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो मागील काही दिवसांपासून रागात होता. 

दहा मिनिटात अटक 

शुक्रवारी जनाबाईकडे समस्यांवर मार्ग सांगण्याचा वार असल्याने, निकेश नेहमीप्रमाणे शिंदे गावात दुपारच्या सुमारास जनाबाईच्या घरी गेला. यावेळी घरात असलेल्या जनाबाईवर त्याने सोबत आणलेल्या चाकूने मानेवर, पोटावर सपासप वार केले. जनाबाई रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडल्या. त्यांची मावस बहीण रंजना माळी हिने आरडाओरडा केल्याने नागरिकही जमा झाले. यावेळेत संशयित निकेश पवार याने पळ काढला. मात्र, सीआर मोबाइल वाहनावरील पोलिस हवालदार विष्णुू गोसावी व त्यांचे साथीदार पोलिस नाईक मनोहर कोळी यांनी त्याला टोल नाका परिसरातून ताब्यात घेतले.

महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

दरम्यान शिंदे गावातील बुवाबाजी करणारी महिला जनाबाई बर्डे यांनी बुवाबाजीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलेच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

Sangli Mass Murder case : म्हैसाळ सामूहिक हत्याकांड; आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानसह चौघांविरुद्ध चार्जशीट दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget