Rajya Sabha Election 2022 : 'अनपेक्षित निकाल, असा निकाल लागेल असं डोक्यातही नव्हतं', मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Rajya Sabha Election 2022 : 'अनपेक्षित निकाल असून असा निकाल लागेल असं डोक्यातही नव्हतं', मतदान सरळ झालं मात्र मतांची गरबड झाल्याचे प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
Rajya Sabha Election 2022 : आमच्यासाठी अनपेक्षित निकाल असून असा निकाल लागेल असं डोक्यातही नव्हतं, मतदान सरळ झालं मात्र मतांची गरबड झाल्याचे प्रतिक्रिया पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते नाशिक दौऱ्यावर असताना 'एबीपी माझाशी संवाद साधला.
राज्यसभेचा निवडणूक निकाल लागला असुन यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. यामुळे शिवसेनेला हा पराभव जिव्हारी लागला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाणी पुरवठा निकालाचे विश्लेषण करताना अनेक बाजुंना स्पष्ट करून त्यांनी निकालबाबतची आपली भुमीका मांडली.
निकालाचे विश्लेषण
पक्षाच्या मतांना असल्यामुळे पक्षांची मतही पाहिजे त्या प्रमाणामध्ये खाल्लं होतं त्याप्रमाणे मतं मिळाली पण बाकीच्या मतांमध्ये गरबड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यावर चिंतन करण्याची अत्यावश्यक गरज आहे. तसेच २० तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणूक होत आहे, त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करण्याची गरज आहे. आज आपण पाहिला असेल की थोडासा निसटता पराभव झाल्यामुळे जवळपास दाह मतांचा फरक दिसतोय आणि याला सरकारसह आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतलेले आहे. पुढच्या काळामध्ये दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करू
निकाल धक्कादायक कि चिंताजनक?
निकालावरून वाटत नाही कि आमचा पराभव झाला आहे. हरलो तर हरलो. हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक असून चितांजनकही आहे. महाविकास आघाडी यावर निश्चित विचार करणार आहे. मात्र पराजय झाला आहे, यावर चिंतन करणे आवश्यक आहे.
कुठे चूक झाली?
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळकट होता. मात्र कुठे चूक झाली, हे लक्षात येत नाही. मतदान झाल्यानंतर आम्ही नाशिककडे निघालो.
मात्र त्यानंतर मतदान मोजणीपासून सुरु झालेला विषय नंतर मत बाद करण्याचा विषय झाला. त्यानंतर लागलेला अनपेक्षित निकाल, असं आमच्या डोक्यातही नव्हता.
भाजपने मात दिली
महाविकास आघाडीसोबत सर्वजण असताना भाजपने मात दिली यावर ते म्हणाले कि, शेवटी या गोष्टीचा विचार करायची गरज आहे. काहीतरी चुका झाल्या असतील आमच्या नाही म्हणा किंवा आमच्या सगळ्या मंत्र्यांकडून झाल्या असतील किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले असेल ती दुरुस्त करण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू.
आगामी रणनीती काय असेल?
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत. भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलवले आहे. पुढची रणनीती ते ठरवतील त्या पद्धतीने काम करू, असे पाटील यांनी सांगितले.
अपक्ष बाजूला गेले?
महाविकास आघाडीला अपक्षांनी पाठिंबा देण्याची संमती दर्शवली होती. मात्र ऐनवेळी असं झालं. त्यामुळे सरकार त्यांच्या पाठिंब्यावर चालते. निकालावरून असं दिसून आले कि, अपक्षांचा आमच्यावरचा विश्वास कमी झाला असेल किंवा त्यांच्या काही मनातल्या कामाची इच्छा असेल ती अपूर्ण राहिली असेल. त्यांनी या मार्गाने राग या मार्गाने व्यक्त केला असेल तर तो राग कमी करण्याकरता येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू.