एक्स्प्लोर

Nashik Accident : त्र्यंबकला देवदर्शन झालं, ब्रम्हगिरीहून परतत असताना भाविकांची मिनी बस उलटली!

Nashik Accident : ब्रह्मगिरी पर्वतावरून परतल्यानंतर माघारी परतत असताना उतारावर बस उलटल्याने अपघात झाला. 

Nashik Accident : त्र्यंबकला (Trimbakeshwer) भाविकांची मिनी बस उलटली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी नाशिक (Nashik Civil Hospital) जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वतावरून परतल्यानंतर माघारी परतत असताना गंगाद्वार जाणाऱ्या ठिकाणी उतारावरील बस उलटल्याने अपघात झाला. 

नाशिक (Nashik) शहरात दर आठवड्यात एका बसचा अपघात समोर येत आहे. सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाशिकसह त्र्यंबकेश्वरला भाविक भेटी देत आहेत. अशातच बुलढाणा येथून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना घडली. त्र्यंबकेश्वर शहरातील ब्रम्हगिरीवरून जाऊन आलेल्या भाविकांनी बसमध्ये बसून प्रवास सुरु केला. ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बस थेट नाल्यात उलटून होऊन समोरच्या झाडाला अडली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र काही भाविक जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. 

दरम्यान त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला असून बस उलटल्याने 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. हे सर्व जण बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याने 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात असून बसमध्ये एकूण 29 प्रवासी होते. त्यापैकी 13 जण जखमी असून प्रेमसिंग फापळ हे गंभीर जखमी आहेत. भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दरम्यान हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तो उतार धोकादायक...
दरम्यान त्र्यंबकेश्वरला वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. अशातच येथील गंगाद्वार आणि ब्रम्हगिरी या ओदनही ठिकाणी अनेकदा पर्यटक भेटी देत असतात. मात्र त्र्यंबकेश्वर गावातून निवृत्तीनाथ मंदिराकडे निघाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे संस्कृती हॉटेल नजरेस पडते. या ठिकाणी गंगाद्वारे आणि ब्रम्हगीरीकडेजाणारा रस्ता आहे. दरम्यान हे दोन्ही पर्यटनस्थळे पाहून आल्यानंतर तीव्र उतार असतो, या ठिकाणी अनेकदा वाहनांचा अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Voter List Row : बोगस मतदार नोंदणी, रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Unseasonal Rains: 'तोंडी आलेला घास हिरावला', Raigad मधील भात उत्पादक शेतकरी संकटात, सरकारकडे मदतीची मागणी
Green Mobility: 'पुण्यात 10,000 EV Truck बनवणार', चाकणमध्ये Blue Energy Motors च्या प्लांट उद्घाटनावेळी मुख्यमंत्री Fadnavis यांची घोषणा
Online Shopping Fraud: Amazon वरून मागवला AC, पार्सलमध्ये निघाला कचरा; Kalmanuri चे Raju Kamble हैराण
Gujarat Politics: 'मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष यांच्यात शीतयुद्ध?', Bhupendra Patel सरकारमधील सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
अवघ्या 10 महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत, त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर पत्नी म्हणाली, पोटात दुखतंय; गॅस्ट्रो-सर्जन डॉक्टर पतीनं तिथंच संधी शोधली अन्... तब्बल सहा महिन्यांनी हत्येचा कट उघडकीस
Gold Rate Prediction: सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सोन्याच्या दरात लवकरच मोठी घसरण होणार? ठेवावे की विकावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Dilip Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा; ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Embed widget