एक्स्प्लोर

Maharashtra MLC Election : तुम्ही पदवीधर मतदार आहात? मग मतदारांनी मत कसे नोंदवावे? हे समजून घ्या!

Maharashtra MLC Election : पदवीधर निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. 

Maharashtra MLC Election : विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार मतदारांना आवाहन करत आहेत. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, हे मतदारांनी समजून घेणे आवश्यक आहे. 

नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर मतदारसंघात नाशिकसह (Nashik) धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर हे महत्वाचे जिल्हे मोडतात. या जिल्ह्यातील पदवीधर मतदार या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावतात. याच मतदारांवर उमेदवाराचा कौल असतो. यासाठी ही मतदान प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे. मत नोंदवण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन वापरु नका.

आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात '1' हा अंक लिहून मत नोंदवा. एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी '1' हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा. निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणास उपलब्ध आहेत. उरलेल्या उमेदवारांकरता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे 2, 3, 4 इ. नोंदवावेत.

पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत...

कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका. पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की - 1, 2, 3, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका. अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये जसे की - 1, 2, 3, इ. किंवा रोमन लिपीमध्ये, जसे की- I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदवता येतील.

पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक...

तसेच मतपत्रिकेवर स्वाक्षरी करु नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका. तुमचा पसंतीक्रम दर्शवण्यासाठी  '✔️' किंवा '✖️' अशा खुणा करु नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील. तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे '1' हा अंक नमूद करुन नोंदवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघासह इतर मतदारसंघातील निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना या सर्व नियमांचे अधीन राहून मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी नियम समजून मगच मतदानाला जावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 27 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सSharad Pawar On Manmohan Singh News : संकट काळात मनमोहन सिंग यांनी देशाला दिशी दिली- शरद पवारABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सRahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Dharashiv Crime: धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Embed widget