(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Suicide : 'एवढ्या पैशात संसार कसा चालवायचा'? ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, बागलाण तालुक्यातील घटना
Nashik Suicide : नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) एका ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांने (Grampanchayat) गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nashik Suicide : नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) एका ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समाधान निंबा पाटील असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायत येथे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेत जीवन यात्रा संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळकोठे ग्रामपंचायत कार्यालयात समाधान हे शिपाई म्हणून कार्यरत होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास हि घटना घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. सकाळी दुसरे कर्मचारी सुरेश गांगुर्डे हे कार्यालयात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. गांगुर्डे यांनी तात्काळ पोलीस पाटील शीला भांबरे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कार्यवाही केली.
दरम्यान समाधान हे वीजपुरवठा रात्री होत असल्याने पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी कार्यालयात जात असायचे. त्यामुळे रात्रीच आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समाधान पाटील हे ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर मानधनावर नोकरी करित होते. त्यांना 4600 रूपये इतके मानधन मिळत होते. त्या मानधनावर त्यांचा प्रपंच होत नसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. समाधान पाटील यांच्या पश्चात आई – वडील , पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे .याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या आर्थिक विंवचनेतुन?
समाधान पाटील हे ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर मानधनावर नोकरी करित होते. वीजपुरवठा रात्री होत असल्याने पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी कार्यालयात जात असायचे. त्यांना 4600 रूपये इतके मानधन मिळत असल्याने या मानधनावर त्यांचा प्रपंच होत नसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. समाधान पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे .