Nashik Gopinath Munde : दोन एकरमध्ये उभारले ‘गोपीनाथ गड’ स्मारक, नाशिकच्या नांदूर शिंगोटेत सर्वात मोठा पुतळा
Nashik Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसविण्यात आला आहे.
Nashik Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून राज्यातील सर्वात मोठा पुतळा असल्याचे बोलले जात आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन एकरमध्ये ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या बीड (Beed) जिल्ह्यातील जन्मभूमीव्यतिरिक्त महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे विशेष स्मारक आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे (Nandur Shingote) येथे भव्य तळ्यात हे स्मारक उभारण्यात आले आहे. या तळ्याला काँक्रिटचे अस्तरीकरण करुन आकर्षक रुप देण्यात आले आहे. मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. स्मारकात बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक इ.सह सजावटीची कामे करण्यात आली आहेत. लवकरच तळ्यात बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार असून नाशिकमध्ये अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणार आहेत.
लोकार्पणासाठी मंत्र्यांची मांदियाळी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व अनुषंगिक विकासकामांसह सिन्नर (Sinner) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरमध्ये ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तर पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक नागरिक व कार्यकर्त्यांनी नांदूर शिंगोटे येथे होणाऱ्या लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी (18 मार्च) सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरु होणार असून या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने नागरिक येणार असल्याने आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
असे आहे गोपीनाथ गड स्मारक!
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरांच्या तळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे असताना 11 एप्रिल 2018 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनास चार वर्षे पूर्ण झाली असून, या तळ्यात साठवणीचे पाणी होते. त्यालाच आकर्षक रुप देण्यात आले आहे. या कामासाठी दोन एकरच्या परिसरामध्ये 400 मोटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 26 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विजय बोनदर यांनी तयार केला आहे. परिसराचे कामकाज सुशांत पाटील यांनी केले आहे. तसेच परिसराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. 85 एलईडीची आकर्षक रोषणाई केली असून ही रोषणाई सौरऊर्जेवर चालणार आहे.