Nashik Google Street View :नाशिकमध्ये गुगल स्ट्रीट व्ह्यू फिचर लॉन्च, कोणतंही ठिकाण 360 अंशात पाहता येणार
Nashik Google Street View : नाशिक (Nashik) शहरातील रस्ते आता गुगल मॅपच्या (Google Map) नव्या स्ट्रीट व्ह्यू फीचरमध्ये (Google street View Feature) 360 डिग्री अशांमध्ये पाहायला मिळणार आहे.
Nashik Google Street View : नाशिककरांना (Nashik) एक आनंदाची बातमी असून शहरातील रस्ते आता 360 डिग्री अशांमध्ये पाहायला मिळणार आहे. गुगल मॅपच्या (Google Map) नव्या स्ट्रीट व्ह्यू फीचरमध्ये (Google street View Feature) हे 360 अंशातील रस्ते बघता येणार आहे. गुगलने भारतातील दहा मोठे शहरांमध्ये ही सुविधा दिल्याची घोषणा नुकतीच केली. त्यात महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई (Mumbai), पुणे आणि अहमदनगरचा ही समावेश आहे.
दरम्यान मोबाईलमध्ये कोणत्या ठिकाणी जायचे असल्यास गुगल मॅपवरून हे रस्ते शोधले जातात. त्यात आता बदल होऊन हे रस्ते 360 डिग्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. याबाबतची घोषणा गुगलने केली असून भारतात स्ट्रिट व्ह्यूला गुगल मॅप्स अँपमध्ये पुन्हा आणले जाणार आहे. सुरुवातीला ही सुविधा 10 शहरात मिळणार आहे. ज्यात बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदाबाद आणि अमृतसर या शहराचा समावेश आहे. या फीचरच्या माध्यमातून गुगल मॅप्स यूजर रस्त्यांना 360 डिग्री व्ह्यू मध्ये पाहू शकतील. कंपनीने यासाठी टेक महिंद्रा आणि जेनेसिस इंटरनॅशनल सोबत पार्टनरशीप केली आहे.
कुठे फिरायला जायचं असल कि सर्वात आधी गुगल मॅपची आठवण येते. यात आपले लाईव्ह लोकेशन व पोहचायचे डेस्टिनेशन टाकून आपल्याला गुगल मॅपद्वारे निश्चित स्थळी जात येते. आता यात आणखी नवा बदल झाला असून गुगलने देशातील दहा शहरात हि सुविधा पुरवण्याचे ठरविले आहे. त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षीच्या गुगल आय हो या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलने या नव्या फीचर्स ची घोषणा केली होती. भारतात हे फिचर उपलब्ध होण्यासाठी गुगलने टेक महिंद्रा आणि जेनेसिस इंटरनॅशनल या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. गुगल स्ट्रीट व्ह्यूमुळे युजर्सना रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणच्या इमारती आदींचा 36 डिग्रीमध्ये पाहायला मिळणार आहे.
दरम्यान या स्ट्रीट व्ह्यू फीचरद्वारे नाशिक शहरांतील रस्त्यांच्या सध्याच्या फोटोसह दीड लाख किलोमीटरचे रस्ते स्ट्रीट व्ह्यूमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणच्या इमारतीचा व्यू सहज बघता येणार आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या देशातील रस्त्यांचे रचना देण्याचे सरकारचे धोरण नसल्याने हे फिचर येण्यास परवानगी मिळत नव्हती. मात्र 2021 मध्ये नॅशनल जिओ स्पेशल पॉलिसी आल्याने भारतातील अशा डेटा व माहितीची मालकी जोपर्यंत परदेशी कंपन्यांकडे नसेल तोपर्यंत असा डेटा माहितीसाठी परवानगी देण्यात आल्याने गुगलला भारतात हे नवीन फिचर लॉन्च करता आले.
असे वापरा नवे स्ट्रीट यू फीचर
अँड्रॉइड गुगल मॅप ओपन करून ठिकाण सर्च करून पिन ठेवावा. तेथे आलेल्या ठिकाणाचे नाव अथवा पत्ता टॅप करायचा. स्कूल करून स्ट्रीट व्ह्यू असे लेबल असेल. फोटो सिलेक्ट करून स्वीट व्ह्यू आयकॉन असलेला थंबनेल तेथे लावण्यात यावा. त्यानंतर गुगल मॅपमध्ये गेल्यावर लेअर्सवर टॅप करून नंतर स्ट्रीट व्ह्यू वर टॅप करून हा पर्याय मिळतो. मॅपवरील निळ्या रेशनवर टॅप केल्यास ट्रीट व्ह्यू मध्ये जाता येते.