(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ATS Raid Nashik : नाशिकच्या पाच संशयितांकडून धक्कादायक माहिती समोर, थेट पुण्याच्या जर्मन बेकरीशी कनेक्शन
ATS Raid Nashik : नाशिकच्या (Nashik) संशयितांकडून धक्कादायक माहिती समोर आली असून पुण्यात (Pune) झालेल्या जर्मन बेकरी (Jarman Bakari Blast) स्फोटातील आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
ATS Raid Nashik : काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थां (NIA) व एटीएसने (ATS) देशभरातील महत्वाच्या शहरात धाडी टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) पदाधिकाऱ्यांचे अटकसत्र करण्यात आले. त्याचबरोबर अनेकांना अटकही करण्यात आली. मालेगाव (Malegoan) येथून अटक केलेल्या व बीड, पुणे, कोल्हापूर (Kolhapur) येथून पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाच जणांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे संशयितांकडून धक्कादायक माहिती समोर आली असून पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
नाशिकच्या (Nashik) मालेगाव येथून सैफुर रहेमान यास अटक केल्यानंतर एटीएस नाशिकमध्ये तळ ठोकून होते,. त्यानंतर राज्यहभरातुन ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना अकरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या पार्शभूमीवर एटीएसने त्यांची कसून चौकशी सुरु असून आज पुन्हा पोलीस कोठडी संपून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र पुन्हा या पाचही संशयितांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रीय तपास संस्था व एटीएस या संस्थांनी काही दिवसांपूर्वी देशभरात अटकसत्र सुरु केले होते. देशभरात कार्यरत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मालेगावमधून देखील दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. तर त्याच दिवशी बीड, जळगाव, कोल्हापूर येथून अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना एसटीएस नाशिक येथे ठेवले होते. त्यानंतर संशयितांना त्याच दिवशी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अटक करण्यात आलेल्या PFI च्या पाच सदस्यांना 03 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. PFI संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसे पुरविले, समाजात अशांतता पसरले असे कृत्य, कट रचणे आदी गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आता कोठडीत वाढ
दरम्यान पहिल्या न्यायालयीन सुनावणीनंतर आज पुन्हा नायायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्यापही पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांकडून PFI संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसे पुरविले, समाजात अशांतता पसरले असे कृत्य, कट रचणे आदी गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे. मालेगाव शहरात झालेल्या पहिल्या कारवाईत मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यास नाशिकच्या एटीएस कार्यालयात हजर करण्यात आले. याच बरोबर राज्यभरातून कोल्हापूर, बीड, उणे आदी शहरात ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले होते.