(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Onion Dahihandi : सटाण्यात शेतकरी संघटनांनी फोडली कांद्याची दहीहंडी, कांदा दरासाठी रास्तारोको आंदोलन
Nashik Onion Dahihandi : नाशिकच्या सटाणा मालेगाव रस्त्यावर प्रहार संघटनेकडून कांद्याची दहीहंडी (Onion Dahihandi) फोडून रास्तारोको आंदोलन (Onion Agitation) करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
Nashik Onion Dahihandi : केंद्र व राज्य शासनाने (Central Government) शेतकऱ्यांची (Farmers) गळचेपी सुरू केली असून कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांबाबत कोणतेही ठोस धोरण त्यांच्या जवळ नसल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव (Malegoan) रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpann Bajar samiti) प्रवेशद्वारा समोर रस्त्यावर कांद्याची दहीहंडी 9Onion Dahihandi) फोडून रास्तारोको आंदोलन (Onion Agitation) करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त कांदा उत्पादन घेणारा असून बहुतांशी शेतकऱ्यांनी अवाढव्य खर्च करून कांदा उत्पादन घेतले आहे व शेतातच चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. मात्र केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण व नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी चुकिची कांदा खरेदी यामुळे बाजार भाव गडगडले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचा लिलाव सुरू होताच प्रवेशद्वारासमोर कांद्याची दहीहंडी तयार केली. त्या दहीहंडीच्या दोरीला पंतप्रधान, खासदार, आमदार यांनी राज्यसभेत व लोकसभेत कांदा भाव वाढीसाठी आवाज उठवावा तसेच पंतप्रधानांनी कांदा आयात निर्यात धोरण सुरळीत राबवावे व नाफेडच्या धोरणांबाबत लक्ष द्यावे असा संदेश या चित्रातून चित्रकार किरण मोरे यांनी दिला होता.
कांदाभावाची कोंडी फुटावी यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली कसमादे भागातील शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेट समोर रस्ता रोको आंदोलन केले याप्रसंगी निवासी नाय तहसीलदार विनोद कुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव सटाणा रोडवर बांधलेल्या कांद्याची दहीहंडी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी फोडली तब्बल दोन तास चाललेले या रासो रोको आंदोलन शेकडो कांदा उत्पादक सहभागी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.
जन आंदोलनाचा इशारा
गेल्या काही महिन्यांपासून उतरती का लागलेल्या कांदा दराला पुन्हा एकदा भरारी मिळावी प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव मिळावा आधी मागण्या करीत सटाणा बाजार समिती बाहेर सोमवारी शेतकऱ्यांनी कांद्याची दहीहंडी फोडली. जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरून हलणार नाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. त्यामुळे कांद्याला समाधानकारक भाव मिळाला नाही. तर प्रहार शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक शेतकरी संघटना मोठे जन आंदोलन करतील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
कांदा चाळीत सडतो आहे....
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सटाणा बाजार समितीच्या गेट समोर कांदा भावाची कोंडी फुटावी. यासाठी कसमादे मधील कांदा उत्पादक शेतकरी प्रहार शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी एकत्रित सटाणा बाजार समितीच्या आवारात रास्ता रोको आंदोलन केली. सरकार कोणाची असो राज्यातली असो वा केंद्राचे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अतिशय उदासीन आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडतो आहे. नाफेडचा कांदा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव हमीभाव मिळाला हवा, यासाठी हे जनआंदोलन उभारण्यात आल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार यांनी सांगितले.