Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये पुन्हा 194 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, अर्ज भरण्यास पितृपक्षाची आडकाठी
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 194 ग्रामपंचायतींच्या (Gram panchayat Election) निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींची (Grampanchayat Election) रणधुमाळीचा गुलाल उतरला नाही तोच, आता पुन्हा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज पासून इच्छुकांना नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 82 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या 166 ग्रामपंचायत इंच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) राज्यातील 82 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या 166 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमध्ये 194 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मंगळवारी निवडणुकीच्या अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यानंतर आजपासून म्हणजेच 21 ते 27 सप्टेंबर या काळात इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान 25 सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष असल्याने नवरात्रीतील 26 आणि 27 सप्टेंबरला अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबरला अर्ज छाननी 30 सप्टेंबरला दुपारी तीन पर्यंत माघारीची मुदत आहे. 13 ऑक्टोबरला मतदान व 14 ला मतमोजणी होणार आहे.
कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीमधील निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपलेली असताना आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील पाच सुरगाणा तालुक्यातील 61 त्र्यंबकेश्वर तालुक्यात 57 तर पेठ तालुक्यात 71 ग्रामपंचायतमध्ये निवडणुका होत असून गेल्या 13 तारखेला या संदर्भातील अधिसूचना जाहीर झाली होती. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार आजपासून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज करू शकणार आहेत. येथे 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
आजपासून म्हणजेच 21 ते 27 सप्टेंबर या काळात इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान 25 सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष असल्याने नवरात्रीतील 26 आणि 27 सप्टेंबरला अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबरला अर्ज छाननी 30 सप्टेंबरला दुपारी तीन पर्यंत माघारीची मुदत आहे. 13 ऑक्टोबरला मतदान व 14 ला मतमोजणी होणार आहे.
पितृपक्षात अर्ज नाही!
एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी तर दुसरीकडे पितृपक्ष सुरु असल्याने उमेदवरांची कोंडी झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या रणधुमाळीनंतर आजपासून सुरु होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पितृपक्षात आल्याने अनेक उमेदवार हे पितृपक्ष संपल्यानंतर अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आजपासून अर्ज प्रक्रिया होत असली तरी घटस्थापनेला उमेदवार अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधणार असल्याचे चित्र आहे.