Nashik News : 25 वर्ष बस चालवली; एकही अपघात नाही, नाशिक विभागात 32 चालकांचा केला खास सन्मान
Nashik News :नाशिक विभागातून 32 एसटी चालकांनी अविरत सेवा बजावून महामंडळाची मान उंचावली आहे.
Nashik News : राज्यातील एसटी महामंडळाची (ST department) सध्या बिकट अवस्था सुरु असून अशातच एसटीला मागील वर्षासह यंदाही अनेक अपघातांना सामोरे जावे लागले. मात्र याही परिस्थितीत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमीपणे एसटी चालवून 25 वर्षात एकही अपघात होऊ दिला नाही. नाशिक विभागातून (Nashik) अशा 32 चालकांनी अविरत सेवा बजावून एसटी महामंडळाची मान उंचावली आहे.
गेल्या अनेक महिन्यांची आकडेवारी बघता नाशिकसह राज्यभरात एसटीचे अनेक हृदय हेलावणारे अपघात घडले. मात्र या एसटी महामंडळात असेही अनेक चालक आहेत, ज्यांनी 25 वर्षाच्या सेवेत एकदाही बसचा अपघात (Bus Accident) होऊ दिला नाही. नाशिकमधील अशा 32 चालकांचा सन्मान एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागात 25 वर्षे विना अपघात सेवा करणाऱ्या 32 चालकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. या सर्व चालकांना 25 हजार रुपयांचा धनादेश विना अपघात सेवा केल्याबद्दल देण्यात आला. तसेच 25 वर्ष विना अपघात सेवा केल्या बद्दलचा बिल्ला आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची सेवा सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. असे असले तरीही अपघातासारख्या काही अप्रिय घटना घडतच असतात. अशा परिस्थितीतही महामहळांच्या ताफ्यातही असे चालक असतात की ज्यांच्याकडून आपल्या 25 वर्षांच्या सेवाकाळात एकही अपघात केलेला नाही, असे चालक इतर चालकांसाठी प्रेरणा असतात म्हणूनच त्यांचा गौरव मंडळातील अशा 32 चालकांना गौरव करण्यात आला. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचा देखील सन्मान करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून विनाअपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सत्कार केला जातो. त्यांना 25 हजारांचे बक्षीस दिले जाते. त्यांच्या पत्नींना साडीचोळी देऊन त्यांचाही सन्मान केला जाती. महामंडळाला आपले कुटुंब मानत असल्यामुळेच चालकांकडून विनाअपघात सेवा घडत असते. आता रस्त्याची स्थिती खूप सुधारत आहे. त्यामुळे गाडी व्यवस्थित चालते, शिवाय मेंटेनंसही कमी निघतो.
एसटी महामंडळाला आपले कर्तव्य आधी मानत मेहनतीने सेवा केली. एसटीला जीवापाड जपले सेवेच्या आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होताना आम्हा कुटुंबीयांना अभिमान वाटतो, अशा प्रतिक्रिया देखील यावेळी उपस्थित चालकांच्या परिवारातील सदस्यांनी दिल्या.
25 हजारांचे बक्षीस
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागात 25 वर्षे विनाअपघात सेवा करणाऱ्या 32 चालकांचा सह पत्नी सत्कार समारंभ रा. प. विभागीय कार्यालय येथे करण्यात आला. त्यांना 25000 रुपयाचा धनादेश विनाअपघात सेवा केल्याबद्दल देण्यात आला. तसेच 25 वर्ष विनाअपघात सेवा केल्या बद्दलचा बिल्ला तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नींना साडी खण देऊन सत्कार करण्यात आला.