Chhagan Bhujbal : येवलेकरांची माफी मागायचं कारण नाही, कामे केली म्हणून वीस वर्ष आमदार : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवल्याला पाठवलं नाही, तर मी येवला मतदारसंघ मागून घेतला.
Chhagan Bhujbal : शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवल्याला पाठवलं नाही, तर मी येवला मतदारसंघ मागून घेतला. तिथल्या लोकांनी प्रेम दिल, म्हणून निवडून आलो. आज वीस वर्षांपासून येवल्यात आमदार म्हणून काम पाहतोय. परत परत निवडून येत असलं म्हणजे जनतेचं प्रेम असेल ना? त्यामुळे चुकीचा उमेदवार दिला, असं होत नाही. काम केलं असेल, म्हणूनच माणूस निवडून येतो ना, असा सवाल करत येवल्याची माफी मागायचं कारण नाही, तुमचं नाव खराब होईल, असेही मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना येवल्याच्या सभेनंतर प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी काल छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात (Yeola) जाहीर सभा घेतली. यात सुरुवातीलाच शरद पवार यांनी येवलेकरांची माफी मागत माझा अंदाज चुकल्याचे ते बोलले. यावर आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले शरद पवार यांनी मला येवल्याला नाही पाठवलं, मी येवल्याला गेलो. 2004 नंतर स्वतःहून येवला मतदारसंघ मागितला. जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो. गेल्या वीस वर्षांपासून निवडणूक लढवून जनतेची साथ मिळत आहे. मग चुकीचा उमेदवार दिला कसा? असा प्रश्न कसा उपस्थित होतो, असा पुनः प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. येवला मतदारसंघात कामे केली म्हणूनच जनतेचे प्रेम मिळत आहे, इथली जनता परत परत तोच उमेदवार कसा निवडून देईल? असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी पवारांना केला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना (Shivsena) तिकिटावर 2 वेळा आमदार झालो. शिवसेनेत मोठे स्थान होते. मात्र तत्पूर्वी गृहमंत्री असताना तेलगीचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी CBI चौकशी झली, त्यात भुजबळ नाव कुठेच नव्हते. नंतर पुन्हा पवारांनी 2004 मध्ये निवडणुकीला उभे राहावे लागेल, असे सांगितले. मला अनेक ठिकाणी निवडणूक लढविण्याची मागणी केली. पवार यांनी प्रेमापोटी रिस्क नको म्हणून सांगितले. पुणे (Pune) येथील जुन्नर येथून लढण्याचा विचार होता. मात्र त्यावेळी येवल्यातील लोक येत होते. त्यांनी सांगितले आमचा तालुका मागासलेला आहे, तिथे विकास करावा. जुन्नरचा विकास झाला आहे, येवला मतदारसंघातून निवडणूक लढतो, असे मी पवार यांना सांगितले. त्यानुसार मी येवल्यातून लढण्यास सुरवात केल्याचे भुजबळ म्हणाले.
नाशिकची जनता माझ्यासोबत
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कालच्या सभेच नियोजन ज्या माणिकराव शिंदें यांनी केले होते. त्यांना 2 जानेवारी 20 ला पक्षातून बाहेर केले. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली होती. त्यांचे पक्षासाठी योगदान नाही, येवल्यासाठी तरी काय योगदान आहे, हे मला माहिती नाही. शिस्तभंगाची कारवाई झालेल्याकडून सभेची तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणारे दराडे बंधू स्टेजवर होते. जे वृद्ध आहेत, ज्यांचे काम संपले होते ते सभेला आले होते, तिथले तरुण मंडळी माझ्या स्वागतासाठी आले होते, त्याचबरोबर नाशिकची जनता माझ्यासोबत असल्याचा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar : येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय : शरद पवार