Nashik News : नाशिकमध्ये दसरा सणाला गालबोट, दांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू
Nashik News : नाशिकच्या (Nashik) दांडिया महोत्सवासह (Dandiya) दसरा सणाला (Dasara Festive) गालबोट लागले आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) दांडिया महोत्सवासह (Dandiya) दसरा सणाला (Dasara Festive) गालबोट लागले असून दांडिया ऐन रंगात असताना इलेक्ट्रिक शॉक (Electric Shock) लागल्याने डीजे ऑपरेटरचा (DJ Operater) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पप्पू बेंडकुळे असे डिजे ऑपरेटरचे नाव असून काल रात्री नऊ वाजेच्या सुमारासची घटना आहे. याबाबत पोलिसांकडून (Nashik Police) अधिक तपास सुरू आहे.
आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा नाशिककर साजरा करत आहेत. दरम्यान गेल्या नऊ दिवसापासून शहरात गरबा दांडियाने चार चांद लावले आहेत. काल सायंकाळच्या सुमारास आडगाव परिसरात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऐन उत्साहात दांडिया सुरू असतांना डीजे ऑपरेटरला विजेचा धक्का लागला. यात डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या आडगाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. नवरात्रोत्सवात दांडिया दरम्यान इलेक्ट्रिक शॉक लागल्याने डिजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. पप्पू बेंडकुळे असे डिजे ऑपरेटरचे नाव असून काल रात्री नऊ वाजेच्या सुमारासची घटना आहे. यावेळी ऐन उत्साहात दांडिया सुरू असतांना डीजे ऑपरेटरला विजेचा धक्का लागला. यात डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे.याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अशी घडली घटना
दरम्यान नाशिक शहरात नवरात्रीनिमित्त (Navratri 2022) आडगाव परिसरात जय जनार्दन फाउंडेशन या मंडळाच्या माध्यमातून दांडियाची आयोजन करण्यात आले हॉप्ट. गेल्या नऊ दिवसांपासून जोरदार दांडिया गरबा खेळाला जात होता. काल शेवटचा दिवस असल्याने आडगाव परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. मागील नऊ दिवसांपासून दांडिया सुरु असल्याने काल देखील नागरिकांनी दांडियाला हजेरी लावली. यावेळी नऊ दिवसांपासून डीजे देखील लोकांच्या सेवेसाठी होता. मात्र काल नऊ वाजेच्या सुमारास दांडिया सुरु असताना अचानक डीजे ऑपरेटर पप्पू बेंडकुळे यास विजेचा शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.