Nashik News : धक्कादायक! नाशिकच्या पेठ तालुक्यात विद्यार्थिनीसह तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चर्चाना उधाण
Nashik News : नाशिकच्या Nashik) पेठ तालुक्यात (Peth) धक्कादायक घटना घडली असून प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Couple Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.
![Nashik News : धक्कादायक! नाशिकच्या पेठ तालुक्यात विद्यार्थिनीसह तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चर्चाना उधाण Maharashtra News Nashik News couple suicide in Peth taluka of Nashik Nashik News : धक्कादायक! नाशिकच्या पेठ तालुक्यात विद्यार्थिनीसह तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, चर्चाना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/d002d22cb9d58ae923828335695eca551659864244_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिकच्या Nashik) पेठ तालुक्यात (Peth) धक्कादायक घटना घडली असून प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Couple Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पेठ तालुक्यातील चोळमुख आश्रमशाळेत (Ashramshala) हे प्रकरण घडल्याचे समजते.
पेठ तालुक्यातील हरसूल पेठ रस्त्यावर (Harsul) शासकीय आश्रम शाळा चोळमुख आहे. या आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास जीवन संपविले. भारती महादू बेंडकोळी असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे. तर आज हरसूल जवळील जातेगाव येथील ज्ञानेश्वर श्याम महाले या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली असून चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थीनींच्या आत्महत्येची घटना समजताच नाशिक प्रकल्प कार्यालयातर्फे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीसाठी पथक शाळेवर पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दोघांनी एका पाठोपाठ आत्महत्या केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.
दोघांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दरम्यान शनिवारी पहाटे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या हरसूल या दोन्ही घटनांबाबत तपास करत असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे हरसूल पोलिसांनी सांगितले. तर एकापाठोपाठ दोघांनी आत्महत्या केल्याने प्रेमप्रकरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)