एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालय तीनवेळा देशात अव्वल, नुसते पुरस्कार काय कामाचे...

Nashik Civil Hospital : नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम (Hospital Building) रुग्णांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

Nashik Civil Hospital : गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणामुळे नाशिक जिल्हा रुग्णालय (Nashik Civil Hospital) नेहमी चर्चेत आहे. जिल्हा रुग्णालयात होत असलेला भोंगळ कारभार काही नवा नाही. अशातच आता जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम (Hospital Building) रुग्णांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील अस्थिरोग विभागातील पीओपीचे छत रुग्णाच्या बेडलगत कोसळल्याची घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गोर गरीब कष्टकऱ्यांच्या आरोग्य सुविधेची मदार ज्या जिल्हा रुग्णालयावर आहे, ते जिल्हा रुग्णालय सध्या अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आहे. जिल्हाभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचारासाठी शासनाकडून आलेले कोट्यवधींचे अनुदान खर्ची घालणार्‍या जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार एकदा समोर आला आहे. येथील अस्थिरोग विभागात दुपारच्या सुमारास रुग्ण दैनंदिन कामकाज करत असताना अचानक पीओपीच्या छत रुग्णाच्या बेडच्या बाजूला पडले. त्याचवेळी रुग्ण सुद्धा बेडवर होता, मात्र बेडच्या बाजूला पीओपीच्या शीट्स पडल्याने अनर्थ टळला. 

दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर पुरुष कक्ष आहे. या कक्षात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसह इतर रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. हा कक्ष अतिदक्षतेचा असल्याचे दिवसभर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची ये-जा सुरू असते. या कक्षात पीओपीसह वातानुकुलित सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, या कक्षात रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कक्षात असलेले पीओपीचे छत ओलसर असल्याने दिवसभर पाणी झिरपत आहे.

पावसाळ्यात डागडुजीची कामे आवश्यक असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र आता पीओपीचे छत गळू लागले आहे. या कक्षातील रुग्ण गुरुवारी दुपारी दोन वाजेदरम्यान बेडजवळ उभा होता. तितक्यात पीओपीचे छत कोसळले. सुदैवाने छत बेडच्या दुसर्‍या बाजूला पडले. ही बाब कक्षातील परिचारिकेला रुग्णांनी सांगितले. तिने घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना पीओपी कोसळल्याची माहिती दिली. तर, रुग्णाच्या सुरक्षेसाठी दुसर्‍या बेडवर बसण्यास सांगितले. या घटनेमुळे कक्षातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालय आधीच 75 कोटींचे निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय साहित्य, बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे राज्यभर चर्चेत आहे. त्यात रुग्णांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याचे समोर येत आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली असून याबाबत लवकरच निधी पुरवला जाणार आहे. शिवाय येत्या सोमवारी जिल्हा नियोजन आढावा बैठक असून जिल्हा रुग्णालयातील या प्रकाराबाबत विचारणा करणार आहे. त्याचबरॊबर सद्यस्थितीत दुरुस्ती करण्याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. सोमवारी बैठकीत निधीची मागणी करण्यात येऊन निधी मंजूर झाल्यास इमारती दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीसह इतर कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. 

नुसते पुरस्कार काय कामाचे... 
नाशिक जिल्ह्यातील हजारो गोर गरीब, कष्टकरी लोकांना आरोग्य सेवा देण्याचे काम जिल्हा रुग्णालय करत असते. मात्र अलीकडच्या वर्षांत जिल्हा रुग्णालय नागरिकांच्या डोक्यात बसले आहे. येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी, प्रशासनाचा भोंगळ कारभार, डॉक्टरांची अनास्था या सर्वांमुळे दाखल रुग्ण वैतागले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या आधारामुळे रुग्णाला हायसे वाटते, क्रित्येकदा फरकही पडतो. मात्र येथील वातावरण दूषित झाल्यामुळे कमी आजारपण असलेला रुग्ण देखील मरणावस्थेत जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोटींचा पुरस्कार घेणारे जिल्हा रुग्णालय मात्र आपल्या अनागोंदी भोंगळ कारभारामुळे जनसामांन्यांच्या नजरेतून उतरत चालल्याचे चित्र आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget