(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिक सिटीलिंक बससेवा ठप्प, दोन महिन्यांपासूनच पगारच नाही, चालक-वाहक संपावर
Nashik news : नाशिक (Nashik) शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून सिटीलिंकचे कर्मचारी संपावर गेले आहेत.
Nashik Citylink : नाशिक (Nashik) शहरातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून आज पहाटेपासून सिटीलिंकचे (Citylink Employee) कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशी वर्गाचे मोठे हाल सुरु आहेत. ठेकेदाराने 2 महिन्यांपासून वेतन न दिल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. महापालिकेने एप्रिलमध्ये सर्व बिले ठेकेदाराला दिली होती. मात्र मे महिन्यापासून पगार केलेला नाही, त्यामुळे पहाटेपासून सर्व वाहक संपात सहभागी झाले आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सिटीलिंक ही बस सेवा (Citylink Bus Service) प्रकल्प दिवसेंदिवस तोट्यात असून दोन वर्षात 70 कोटी रुपयांचा तोटा या बससेवेमुळे महापालिकेला सोसावा लागला आहे. दुसरीकडे ठेकेदाराला कोट्यवधी रुपये रोख मोजून देणाऱ्या पालिकेकडून 500 वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. तरी ठेकेदारांवर कोणतेही कारवाई होत नसल्याने आज सकाळी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे आज सकाळपासून नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे. पगार थकल्यामुळे सिटीलिंकचे कर्मचारी पहाटेपासून संपावर गेले आहे. त्यामुळे एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे. ठेकेदाराने 2 महिन्यांपासून पगार न दिल्याने हा संप पुकारला आहे. महापालिकेने एप्रिलमध्ये सर्व बिले ठेकेदाराला दिली होती. मात्र मे महिन्यापासून पगार दिला नाही, त्यामुळे पहाटेपासून सर्व वाहक, चालक संपात सहभागी झाले आहेत.
सिटीलिंक बसच्या वाहकांनी आज काम बंद आंदोलन (Protest) सुरु केले आहे. पगार द्या, पगार द्या अशी घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. यामुळे सकाळपासून सिटीलिंक बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाशांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून येत आहे. सिटीलिंक बस डेपो, तपोवन या ठिकाणी सकाळीच्या सुमारास सिटीलिंक बस सेवेत कार्यरत असलेल्या वाहकांनी आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यांपासून पगार होत नसल्याने त्यांनी आंदोलन पुकारले आहे. महापालिकेच्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याने सिटी लिंककडून ठेकेदाराला झालेला दंड कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याचा ठेकेदाराचा इरादा असल्यानेच वाहकांचा पगार थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. आधीच दोन महिने पगार नाही. त्यात दंड कसा भरायचा असा पेच कर्मचाऱ्यासमोर उभा राहिला आहे.
दोन महिन्यांपासूनच पगारच नाही....
सिटीलिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड म्हणाले की, ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन थकवल्यामुळे वाहकांनी आज आज काम बंदचा इशारा दिल्याने सकाळपासून वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यामुळे ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून संप टाळण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहिल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल दिला आहे. संप करु नये, याकरता दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस ठाणे, मनपा आयुक्त व कामगार आयुक्त यांना देखील पत्र व्यवहार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. थकीत पगार मिळावा, दरमहा पगार वेळेवर व्हावा, अशा मागण्या असून यापूर्वी देखील अनेकदा पगार वेळेवर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आली आहेत. त्यानंतर आज पुन्हा याच मागण्यांसाठी हे आंदोलन झाले आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या :
Nashik Workers Strike : सिटीलिंक बससेवा ठप्प, 3 महिने वेतन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचारी संपावर