Dhule Crime : मुंबई आग्रा महामार्गाने प्रवास करताय सावधान! धुळे पोलिसांकडून टोळीला अटक
Dhule Crime : मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) लुटणाऱ्या टोळीला धुळे पोलिसांनी अटक केली आहे.
Dhule Crime : मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) औषधी माल भरून घेऊन जाणारा ट्रक लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात धुळे शहरातील आझाद नगर पोलिसांना (Dhule Police) यश आले असून या कारवाई पोलिसांनी एका महिलेसह सहा पुरुष संशयितांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल एक लाख 41 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे....
धुळे (Dhule) शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडी उड्डाणपुलाच्या खाली धुळ्याकडून शिरपूर कडे (Shirpur) जाणाऱ्या सर्विस रोडने आयशर ट्रक मधून औषधी मालाची इंदोर कडे वाहतूक होत होती, या आयशर ट्रक वरील चालक आणि वाहकाला उड्डाणपुलाच्या खाली एक महिला आणि दहा ते अकरा पुरुषांनी ट्रकच्या केबिन मधून खाली उतरून चाकूचा तसेच लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याचा धाक दाखवत जबर मारहाण करून चालक आणि वाहकांचे हात बांधून त्यांच्या जवळील रोख रक्कम तसेच मोबाईल चोरून नेले होते.
या टोळीला गजाआड करण्यात आझाद नगर (Azad Nagar) पोलिसांना यश आले असून काही तासातच पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी असलेले एक महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू लोखंडी पाईप आणि चार मोटरसायकल असा एकूण 1 लाख 41 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींनी यापूर्वी देखील महामार्गावर अशाच प्रकारे केलेले गुन्हे उघडकीस येतील. तसेच इतर फरार झालेल्या संशयितांनाचा लवकरच शोध घेण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (Sanjay Barkund) यांनी दिली आहे.
सिन्नरमध्ये अवैध धंद्याना चाप
एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे (Sinnar Police) हद्दीत माळेगाव गावात मारूती मंदीराचे जवळ असलेल्या हरीओम बिल्डींगमध्ये हरी ओम किराणा दुकानाचे पाठीमागे लिक्वीड पेट्रोलियम गॅसचा (Petroleum Gas) गैरकायदेशीरपणे अनधिकृत साठा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने माळेगाव गावात (Malegaon village) छापा टाकला असता कारवाईत विशाल ज्ञानेश्वेर काकड यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे लिक्वीड पेट्रोलियम गॅसचे गैरकायदेशीरपणे अनधिकृत साठा करतांना व विक्रीच्या उद्देशाने बाळगातांना तसेच वाढीव दराने गॅस विक्री करतांना आढळून आल्याने एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.