Nashik News : अत्याचार झाल्याचं आठ दिवसांनी भावाला समजलं, डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
Nashik News : पेठ तालुक्यातील भुवन येथील (Peth Taluka) आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.
Nashik News : पेठ तालुक्यातील भुवन येथील (Peth Taluka) आश्रमशाळेतील (Ashram School) विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आश्रमशाळा अधीक्षकासह महिला अधीक्षकास निलंबित करण्यात आले होते. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून अत्याचार झाल्यानंतर पीडितेच्या भावाला आठ दिवसांनंतर समजले होते. या प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ जवळील भुवन येथील शासकीय आश्रमशाळेतील मुलीशी लैंगिक गैरवर्तन (Molestation) केल्याची घटना घडली होती. या संदर्भांत चौकशी करण्यात येऊन आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल तायडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर महिला अधीक्षकाचे देखील निलंबन करण्यात आले होते. आत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe) यांनी निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, आठ दिवसांनी बहिणीवर अत्याचार झाल्याचे भावाला समजले. तोपर्यंत आश्रमशाळेच्या अधीक्षीका, मुख्याध्यापक आणि पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. 15 दिवस होवूनही तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संशयितांवर कारवाई करावी, पीडित मुलीस अन्य शासकीय आदिवासी आश्रमशाळेत स्थलांतरीत करावे. तक्रार घेण्यास विलंब करणार्या, पीडित मुलीचे जबाब बदलणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. आश्रम शाळेत मागील वर्षभरात कोण-कोणत्या अधिकार्यांनी भेटी व आश्रम शाळेच्या केंद्र तपासण्या केल्या व त्यांच्या तपासणीची गुणवत्ता तपासण्यात यावी. राज्य शासनाच्या सर्व आदिवासी, सामाजिक न्याय, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण व शासनाच्या अनुदानातून चालवण्यात येणार्या सर्व महिला व मुलींच्या वसततिगृहात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक योजना आखाव्यात असे म्हटले आहे.
मुलीला न्याय देण्याचे निर्देश
पीडित मुलीने न्यायालयासमोर जबाब सुरु असताना अत्याचार केल्याचे सांगितले आहे. पेठ पोलीस ठाण्यातील (Peth Police Station) पोलिसांनी संवेदनशीलपणे तक्रार नोंदवली नाही. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी बोलणे झाले असून, या प्रकरणाची चौकशी करावी, असे सांगितले आहे. ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला, त्याच्यांवर कारवाई करावी. पीडित मुलीला दुसर्या आदिवासी आश्रमशाळेत स्थलांतरीत करावे. संशयितांना जामीन मिळाला असला तरी पोलिसांनी जामीन रद्दसाठी प्रयत्न करावेत. या प्रकरणात दररोज पीडित मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क असून, मुलीला न्याय मिळावा, यासाठी संबंधितांना निर्देश दिले असल्याचे डॉ. नीलम गोर्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.